विहीरगाव कक्ष 2 मधील सागवानाची अवैध वृक्ष तोड प्रकरण
नेरी : पळसगाव वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या मदनापूर उपक्षेत्रातील नियतक्षेत्र विहीरगाव क्र २ मध्ये मिश्र रोपवणातील मौलवान सागवानाची सागतस्करा कडून खुलेआम तोड केली गेली आहे.सोन्याच्या किंमतीने विकल्या जाणाऱ्या सागवानाची अशी अवैध तोड झाली आहे. तेव्हा पुन्हा एकदा वनकर्मचाऱ्या भोंगळ कारभारामुळे वृक्षतोड झाली असून निदर्शनास आली आहे. ताडोबा बफर झोन सुरक्षित, वनक्षेत्र असताना तस्करी झालीच कशी ? हा एक प्रश्न नागरिकांना पडला आहे.
. साग झाडे कुऱ्हाडीच्या सहाय्याने कापली गेली आहेत.प्रत्यक्ष घटनास्थळी बघितले असता सर्व स्पष्ट दिसत असून स्थानिक वनाधिकारी मात्र सर्व ठीक असल्याचे वरिष्ठना चुकीची आणि खोटी माहिती दिल्या जात असल्याचे बोलल्या जात आहे. रात्रौला वनपाल, वनरक्षक,वनाधिकारी हे मात्र मुख्यलायी न राहता काही दिवस शहरात राहत असल्याने चोरीचे प्रमाण वाढले आहे.अवैध वृक्षतोड ही वनक्षेत्राच्या मुळावर उठली आहे. राखीव वनक्षेत्रात स्वार्थासाठी वृक्षतोड करण्यात येते. काही स्थानिक नागरिक व काही वेळा वनविभागाची पडद्यामागची छुपी कामगिरी यामुळे ही समस्या ओढवली आहे. जीवंत असलेले व पूर्ण वाढ झालेली वृक्ष तोडली जात आहेत.मात्र याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे.तेव्हा या प्रकरणात वरिष्ठ वनाअधिकारी कोणावर कारवाई चा बडगा उचलतात किंवा थातूर माथूर चौकशी करून मोकळे होतात या कडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
संबंधित प्रकरणाची वनपरिक्षेत्र अधिकारी आणी वनरक्षक कडून अहवाल मागितल्या नंतर पुढील चौकशी करण्यात येईल. संकेत वाठोरे, सहाय्यक वनसरक्षक चंद्रपूर


