३७ हजाराचा मुद्देमाल जप्त
कोठारी पोलिसांची कारवाई
कोठारी : बल्लारपूर वरून कोठारी मार्गे गोंडपिपरी कडे दुचाकीने अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एकाला कोठारी पोलिसांनी शुक्रवारी दि.१० मे रोजी सकाळी १०.३० वाजता अटक केली.
. पोलीस सूत्रानुसार बल्लारपूर ते कोठारी मार्गे गोंडपिंपरी कडे अवैध देशी दारू वाहतुकीची गोपनीय माहिती मिळाल्यावरून बल्लारपूर ते गोंडपिपरी महामार्गावर झरण फाटा जवळ सापळा रचून कारवाई केली असता दोन विधिसंघर्शित बालक रा चंद्रपूर हे दुचाकी सुझुकी मोपेड ने दोन बोरी मध्ये ९० एम एल च्या एकूण ५०० नग (पाच बॉक्स) दारू साठा वाहतूक करतांना मिळून आले.
. मिळून आलेला दारु साठा किंमत १७ हजार पाचशे रू व एक मोपेड किंमत अंवडजे २० हजार रू असा एकूण ३७ हजार पाचशे रू चा मुद्देमाल जप्त करून चंद्रपूर येथील दोन विधी संघर्शित बालकांवर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
. सदरची कारवाई मा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार आशिष बोरकर यांचे नेतृत्वात कोठारी पो स्टे चे साईनाथ उपरे, ज्योती आकतोटावार यांनी केली.


