Home चंद्रपुर जिल्हा विशेष विद्युत खांबाचा शॉक लागून २ गायीचा मृत्यू

विद्युत खांबाचा शॉक लागून २ गायीचा मृत्यू

1344

नेरी येथील घटना

नेरी : गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसाने अनेक गावाची बत्ती गोल झाली तर अनेक गावात विजेचे तार तुटलेले आहे. चिमूर तालुक्यातील नेरी येथे दुपारी 3 च्या सुमारास शिवमंदिर समोरील खांबाला शॉक लागून 2 गायीचा मृत्यू झाला.

.        प्राप्त माहितीनुसार गुरुवारी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळाने विद्युत खांबाचे तार तुटले यामुळे खांबाला विद्युत प्रवाह आला. या खांबाला गायीचा स्पर्श झाल्याने शॉक लागून दोन गायीचा जागीच मृत्यू झाला. दिनाक 9 मे रोजी नेरी येथील रहिवासी संजय बापूराव काळे यांचे मालकीच्या 2 गाईवर शिवमंदिर समोरील खांबाला चीपकुन जागेवरच ठार झाल्या यात संजय बापूराव काळे यांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले असून महावितरण ने तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे.

.        तसेच पोलिसांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेत चौकशी केली आणि पंचनामा होत नाही तोपर्यंत घटनास्थळी गायी मालकाने गायींना जागावे असा अजब सल्ला दिला तेव्हा संबंधित विभागाने तात्काळ गायीचा पंचनामा करावा अशी मागणी होत आहे.

error: Content is protected !!