अडेगाव देश येथील शेत शिवारातील घटना
नेरी : चिमूर तालुक्यातील नेरी जवळील अडेगाव देश येथील शेत शिवारात दुपारी बारा वाजता च्या दरम्यान अचानक विजेच्या कडकडाट आणि अवकाळी पावसाला सुरवात होऊन वीज कोसळली. यावेळी एक बैल व गाय जागेवरच ठार झाले मात्र इतर कुठलेही हानी झाली नाही.
. सध्या अवकाळी पावसाचा विजेच्या कडकडाटा सह पावसाचे थैमान सुरू असून आज दि 9 मे ला दुपारी 12 वाजता दरम्यान अडेगाव देश येथील अल्पभूधारक शेतकरी रामू नथ्यू बदके यांच्या मालकीचे गाय व बैल असून शेतशिवरात चरत असल्याचे सांगण्यात येत आहे अचानक चक्रीवादळ व विजेच्या कडाडण्याला सुरवात झाली क्षणात वीज कोसळली त्यामुळे गाय बैल जागेवरच ठार झाले त्यामुळे शेतकरी रामू बदके यांच्यावर अस्मानी संकट कोसळले असून मोठे नुकसान झाले आहे.
. सदर घटनेची माहिती होताच महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन मृत जनावरांचा पंचनामा केला असून अहवाल वरिष्टकडे सादर केला आहे. सदर जनावरांच्या अचानक जाण्यामुळे मोठे नुकसान झाल्याने प्रशासनाने तात्काळ शेतकरी रामू बदके याना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


