Home चंद्रपुर जिल्हा विशेष जिल्हा मध्यवर्ती बँकेचा कारभार दोन कर्मचाऱ्यावर

जिल्हा मध्यवर्ती बँकेचा कारभार दोन कर्मचाऱ्यावर

1359

कर्मचारी संख्या वाढविण्याची मागणी

ग्राहकांच्या लांबच लांब रांगा 

ग्राहकाची गैरसोय

पंकज रणदिवे

नेरी : चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेली व अग्रगण्य बँक असलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ची शाखा नेरी येथे असून चिमूर तालुक्यात चिमूर नंतर सर्वात जास्त खातेदार व व्यवहार असलेली बँक आहे. मात्र सर्वात जास्त व्यवहार असूनही जिल्हा बँकेच्या भोंगळ कारभरामुळे नागरीकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावं लागतं आहे. एवढ्या मोठ्या खातेदार असणाऱ्या बँकेचं संपूर्ण भार 2 कर्मचाऱ्यावर राहिलेला आहे. या शाखेत हल्ली 1 शाखा व्यवस्थापक, 1 लिपिक, 1 रोखपाल असे कर्मचारी आहेत. त्यामुळे नागरिकांना गैरसोय होत असून कर्मचाऱ्यांचे सुद्धा हाल होताना पहावयास मिळत आहे.

.       एकीकडे बँकेला संलग्न असलेल्या सहकारी संस्था तर्फे शेतकऱ्यानं कर्जवाटप सुरू असून कर्जवाटपाची रक्कम खात्यात जमा होतात शेतकरी बँकेत गर्दी करीत आहेत तसेच इतर शासकीय निधी व निराधार यांचे सुधा मानधन मोठ्या प्रमाणत याच बँकेत जमा होत असतात त्यामुळे सदर रक्कम काढण्याकरिता शेतकरी, शेतमजूर, वृध्द, अपंग लोकांना रोज बँकेत यावे लागते मात्र कर्मचारी नसल्यानें उशिरापर्यंत बँकेत बसावे लागत आहे.

.       त्यामुळे बँक प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन तत्काळ नेरी शाखेतील कर्मचारी संख्या वाढवावी अशी मागणी ग्राहकांकडून करण्यात येत असून ग्राहकांची गैरसोय दूर न केल्यास व कर्मचारी संख्या न वाढविल्यास बँकेला कुलूपबंद आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

error: Content is protected !!