जागृती सामाजिक संघटनेची मागणी
वरोरा : वरोरा येथील बस स्थानक आणि नेताजी शाळा यांच्या जागेची अदला-बदली करुण नेताजी शाळेच्या जागेवर आधुनिक बस स्थानक आणि बस स्थानकाच्या जागेवर नेताजी शाळा जिल्ह्यात तसेच राज्यात मॉडेल बनेल अशी बनविण्यात यावी अशी मागणी गेल्या काही वर्षा पासून जागृती सामाजिक संघटना करीत आहे.
. बस स्थानक समोर ओवर ब्रिज बनल्यापासून बस स्थानकाला अडथळा निर्माण झालेला आहे. बस स्थानकावर आलेली बस शाहिद योगेश डाहुले चौकातुन फिरून जावे लागत आहे. यात वेळेचा व इंधनाचा खर्च वाढलेला आहे. यात शाहिद योगेश डाहुले चौकातुन फिरून जात असताना अपघाताची शक्यता आहे. याचमुळे परिवहन महामंडळने जागेच्या अदला-बदलीला समर्थन दर्शविले आहे. जिल्हा परिषदेकडून अदला-बदलीला अजुन परवानगी मिळालेली नाही. परवानगी मिळताच बस स्थानक नेताजी शाळेच्या जागेवर येईल. नागपूर-चंद्रपूर हाईवे रोडवर नेताजी शाळा असून सध्या विद्यार्थी संख्या नसल्यामुळे शाळा बंद करण्यात आली होती. नेताजी शाळा जिल्ह्यात तसेच राज्यात मॉडेल बनेल अशी बनविण्यात यावी त्यामुळे विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणावर वाढेल.
. याकरीता माजी मुख्यमंत्री आजचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते, दिवंगत खासदार बाळू धानोरकर, माजी खासदार हंसराज अहीर, आमदार प्रतिभा धानोरकर, संध्या गुरनुले माजी अध्यक्ष जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर यांना गेली पाच वर्षापासून निवेदनाद्वारे मागणी केली होती. तर पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी लगेच माजी परिवहन मंत्री अनिल परब आणी मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर यांचेशी पत्रव्यवहार केला होता.
. जागृती सामाजिक संघटना अध्यक्ष, प्रविण धनवलकर, अमित चवले, मारोतराव कुरेकार, प्रविण सुराणा, मनिष जेठानी, डॉ. राजेन्द्र धवस, विलास नेरकर, वसंतराव मनुसमारे, योगेश डोंगरवार, प्रशांत जुंजारे यांनी मागणी केली आहे.


