Home चंद्रपुर जिल्हा विशेष शेतकर्‍यांवर गुन्हे : भ्रष्ट अधिकारी व कंत्राटदारावर कारवाई कोण करणार ?

शेतकर्‍यांवर गुन्हे : भ्रष्ट अधिकारी व कंत्राटदारावर कारवाई कोण करणार ?

1266
  • शेतकर्‍यांचा संतप्त सवाल
  • अवैद्य वृक्ष तोड प्रकरण

नेरी : साग व आडजात जातीच्या झाडांची अवैद्य रित्या वनविभागाचे अधिकारी व कंत्राटदार यांच्या संगनमताने कत्तल करण्यात आली. दैनिक नवजीवन ने यावर प्रकाश टाकताच  प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीने  शेतकर्‍यांच्या शेतात सागवन सह इतर झाडांची सातबारावर नोंद नसताना अनाधिकृत रित्या हाताने डिजिटल सातबारावर नोंद करण्यात आली. व शेतकर्‍यावरच गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणातील भ्रष्ट अधिकारी व कंत्राटदारावर कारवाई कोण करणार ? असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहे.

.      चिमूर तालुक्यातील नेरी परिसरातील तळोधी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सावरगाव, कारघाटा, चिखलापार, खरकाडा शेतशिवरात मागील एक महिन्यापूर्वीपासून वृक्षाची कत्तल सुरू होती. सदर कत्तल ही साग व आडजात वृक्षाची विना परवानगी करण्यात आली. शेकडो वृक्ष नाल्यातील व बाहेरील बिनधास्त कापण्यात आली मात्र एवढे होऊनही वनविभागाला माहिती नसल्याचे  दाखवण्यात आले. त्यांनतर वृत्तपत्रांत बातम्या प्रकाशित होताच वनरक्षकांनी कारवाई करीत वृक्ष जप्त केले मात्र ज्या अधिकाऱ्याच्या परवानगीने हे वृक्ष तोडले त्याला ही बाब माहीत नसणे हे संशयास्पद बाब आहे. शेतकरी व कंत्राटदार हे या विभागाच्या क्षेत्रासहायक अधिकारी यांच्याकडे सातबारा सादर करतात आणि परवानगी मागतात त्यावेळेस त्यांनी ही वृक्ष सातबाऱ्यावर आहेत की नाही याची पडताळनी करणे गरजेचे असते.

.      नाल्यातील वृक्ष तोडणे हा गुन्हा असतानाही ते तोडले कसे कुणी परवानगी दिली, वृक्ष तोडण्याचा खसरा कसा बनवला गेला तसेच वाहतूक परवाना कुणी दिला हे सर्व प्रश्न निर्माण होत आहेत.  यासाठी मुख्यत्वे परवानगी देणारे क्षेत्रासहायक अधिकारी आणि वृक्ष कापणारे कंत्राटदार या प्रकरणात दोषी असतानाही आपल्या चुका लपविण्यासाठी अडाणी शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करून वनविभागाने स्वतःच्या अकलेचे दर्शन दिलेच आहे. मात्र यात शेतकऱ्यांचा दोष काय दोष? असा प्रश्न जनमानसात पडलेला आहे. शेतकरी सातबारा वर उल्लेखित वृक्षांची विक्री करतो मात्र त्यावर खोडतोड करून परवानगी अधिकारी देतात कशी, असा यक्ष प्रश्न पडलेला आहे.

.      लाखो रुपयांचा भ्रष्टचाराचा प्रकार  एक महिन्यांपूर्वी पासून होत असूनही वनविभाग शेतकऱ्यावर कारवाई करून गप्प बसला असल्याने वनविभागाच्या कारवाईच्या भूमीकेकडे नागरिक संशयास्पद भूमिकेने बघत असून सर्व प्रकरण दडपल्या जाणार की काय ? असा प्रश्न नागरिक इतर शेतकरी उपस्थित करीत असून वनविभागाच्या कारवाईस विलंब होत असल्याने परिसरातील नागरिक उलटसुलट चर्चा करताना दिसतं आहेत त्यांमुळे आता तरी तात्काळ वनविभागाने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर वृक्ष कत्तल प्रकरणी दंडात्मक कारवाई करून निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.

error: Content is protected !!