Home राजकीय महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिवपदी चेतन शर्मा यांची नियुक्ती

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिवपदी चेतन शर्मा यांची नियुक्ती

1178

वरोरा : येथील सराफा व्यावसायिक तसेच सामाजिक कार्यकर्ते चेतन शर्मा यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.

.       वरोरा- भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर, यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या वतीने नियुक्तीपत्र देऊन चेतन शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली, यावेळी प्रदेश सचिव अमर गोंडणे, विधानसभा प्रमुख गौतम अंबाडे, निलेश खोब्रागडे, तसेच अभिजीत गमे, अभय ठावरी,रुपेश दुग्गड वरोरा हे उपस्थित होते.

.       २००७ ते २०१२या कालावधीत चेतन शर्मा हे युवक काँग्रेस अध्यक्ष वरोरा शहर या पदावर कार्यरत होते तर २०१२ ते २०१४ मध्ये जिल्हा महासचिव युवक काँग्रेस म्हणून त्यांनी काम पाहिले चेतन शर्मा हे निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ता म्हणून ओळखले जातात. दांडगा जनसंपर्क तसेच पक्ष संघटन व पक्षाचे मजबुतीकरण करणे असा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला चेतन शर्मा यांच्या निवडीबाबत माजी नगराध्यक्ष विलास टिपले, तालुका अध्यक्ष मिलिंद भोयर, राजेंद्र चिकटे, राजू महाजन,  सलीम पटेल, अल्पसंख्यांक सेल वरोरा यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!