भद्रावती : भद्रावती तालुका बहुजन समन्वय समिती ची हुतात्मा स्मारक भद्रावती येथे दिनांक. 26 फेब्रुवारी ला पार पडलेल्या बैठकीत माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांचे अध्यक्षतेखाली भद्रावती तालुका कार्यकारणी गठन करण्यात आली.
. या कार्यकारणीत अध्यक्ष म्हणून अॅड. महेश ठेंगणे, उपाध्यक्ष रमेश मेश्राम, व सचिव नरेश काळे, विकास दुर्योधन, सहसचिव विशाल गौरकार, कोषाध्यक्ष सुनिल आवारी, संघटक संजय आसेकर, सहसंघटक पुरुषोत्तम नैताम, संयोजक राहुल सोनटक्के, नामदेव रामटेके, प्रसिद्धी प्रमुख लिमेश माणुसमारे, उमेश काकडे मार्गदर्शक ऍड. भुपेंद्र रायपूरे, लक्ष्मण बोढाले तर सदस्य म्हणून रितेश वाढई, दिलीप वानखेडे, सचिन नक्षीने, सिकंदर शेख, पांडुरंग बोढाले, नागसेन पाझारे, बापूजी पारखी, स्वप्नील कोल्हाटकर, अनिल धानोरकर, अजय बोडे, पांडुरंग टोंगे, जनार्धन पिदूरकर, पांडुरंग कोयचाडे आदींचा समावेश आहे. या समितीत ओबीसी एससी, एसटी, एसबीसी, एनटी, व्हीजे व इतर सर्व बहुजन समाजाचा समावेश आहे.
. सर्व बहुजन समाजाला एकत्रकरून त्यांना मुख्य प्रवाहात आणने, ओबीसींची जातीनिहाय जनगणना करणे, सामाजिक समस्या व अन्यायकारक धोरणाबाबत लढा देणे हा या समन्वय समितीचा उद्देश असल्याचे प्रसिद्धी प्रमुख लिमेश माणुसमारे व उमेश काकडे यांनी कळविले.


