Home चंद्रपुर जिल्हा विशेष कौटुंबिक वादातून मुलाने जन्मदात्या आईलाच पाठविले यमसदनी

कौटुंबिक वादातून मुलाने जन्मदात्या आईलाच पाठविले यमसदनी

1159

क्रूर मुलगा पोलिसांच्या ताब्यात

आईचा जागीच  मृत्यू : वडीलांची प्रकृती चिंताजनक

कोरपणा तालुक्यातील घटना 

गडचांदूर : कौटुंबिक वादातून संतापलेल्या मुलाने चक्क आपल्या जन्मदात्या आई वडिलांना एका खोलीत बंद करून कुर्‍हाडीने दोघांवरही वार केला. यात आई चा जागीच मृत्यू झाला. तर वडिल गंभीर जखमी झाले असून त्यांची  प्रकृती चिंताजनक आहे. सदर घटना कोरपना तालुक्यातील लोणी येथे बुधवारी 21 फेब्रुवारी ला  दुपारी अंदाजे 2 वाजताच्या सुमारास घडली. कमलाबाई सातपुते असे मृतक आईचे नाव आहे. तर मनोज पांडूरंग सातपुते (45) असे क्रूर आरोपी  मुलाचे नाव आहे.

.        कोरपना तालुक्यातील लोणी येथे पांडुरंग सातपुते  यांची शेत जमीन असून शेतजमीन ठेक्याने देऊन आलेल्या ठेक्याच्या पैशावरून मुलगा आरोपी मनोज व त्याची वहिनी, आई वडील यांच्यात कौटुंबिक वाद झाल्याचे समजते. हा वाद विकोपाला जात संतापलेल्या मनोज ने चक्क आपल्या जन्मदात्या आई वडिलांना एका खोलीत बंद केले. आणि घरातील कुर्‍हाड घेऊन अत्यंत क्रूरतेने आईच्या डोक्यावर कुऱ्हाडीने 4 आणि हातावर 2 वार करून आईला जागीच यमसदनी पाठविले.  तर वडीलाच्या डोक्यावर 2 वार करून त्यांना  गंभीर जखमी करून वहीनीच्या मागे धावला, मात्र तीने स्वताला एका खोलीत बंद करून आतून दरवाजा बंद केल्याने तिचा जीव वाचला.

.        या थरारा नंतर आरोपी मनोज सातपुते नी गावातून पळ ठोकला. सदर घटना शेजार्‍यांना माहीत होताच पोलिसांना माहिती देण्यात आली. गावकर्‍यांनी पांडुरंग सातपुते यांना कोरपणा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र पांडुरंग सातपुते यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. कोरपणा पोलिसांनी घटनेच गांभीर्य लक्षात घेत तपास चक्र फिरवीत आरोपी मुलगा मनोज पांडूरंग सातपुते याला काही वेळातच अटक केली. पुढील तपास कोरपणा पोलिस करित आहे.

error: Content is protected !!