झाडाला गळफास घेतलेल्या आढळला मृतदेह
आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
विसापूर : तेलंगणा राज्यातील एका इसमाने बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील एका शेतकऱ्याच्या बैलाच्या गोठ्याजवळ झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवार ( दि. २१ ) रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आली. यामुळे गावात एकच खळबळ माजली. तेलंगणातील इसम नेमका विसापूर येथे कसा आला. त्याने गळफास घेऊन जीवनयात्रा का संपवली, याचा शोध पोलीस घेत आहे. मृतकाचे व्यंकटस्वामी पिगदीला (५0) रा. पिगवपल्ला ता. कोडेल जि. नगरकरणूल ( तेलंगणा ) असे आहे.
. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील एका शेतकऱ्याच्या तनसाच्या ढिगाऱ्या जवळील बाभळीच्या झाडाला लुंगी फाडून तिच्या साहाय्याने गळफास घेऊन अज्ञात इसम आत्महत्या केल्याचे आढळून आले. याची माहिती विसापूर पोलीस चौकीचे जमादार जीवन पाल व गजानन साखरकर यांना गावाकऱ्यांनी दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून माहिती मिळवण्याच्या प्रयत्न केला. त्यावेळी मृतक व्यंकटस्वामी पिगदीला यांच्या खिशात एका चिठ्ठीवर मोबाईल क्रमांक मिळाला. त्या आधारे पोलिसांनी संपर्क केला असता, त्याची ओळख पटल्याची माहिती पोलिसांनी दिली. व्यंकटस्वामी पिगदीला यांचे नातेवाईक तेलंगणातून आल्यावर त्याच्या मृतदेहाचे शेवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्याचा मृतदेह बल्लारपूर ग्रामीण रुग्णाल्यात ठेवण्यात आला आहे.
. तेलंगणातील इसम विसापूर येथे नेमका कसा आला. त्याने स्वतःच गळफास घेतला कसा.घातपात झाला का. या दिशेने पोलीस तपास करत आहे. त्याच्या मृत्युचे अद्याप कारण अस्पष्ट आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यावर मृत्युचे नेमके कारण माहित होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा पुढील तपास बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक असिफराजा शेख यांच्या मार्गदर्शनात विसापूर पोलीस चौकीचे जमादार जीवन पाल व साखरकर करत आहे.


