Home चंद्रपुर जिल्हा विशेष अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला 

अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला

1192

महसूल पथकाची कारवाई

वरोरा : सध्या वरोरा तालुक्यातील रेती घाट लिलाव झाले नसल्याने रेती तस्कर चोरट्या पद्धतीने रेतीची तस्करी करतांना दिसत असून या अवैद्य रेती तस्कराविरोधात  महसूल विभागाने कंबर कसली असून धडक कारवाही चा बडगा उभारला आहे. 14 फेब्रुवारीला नागरी येथे अवैधरित्या रेती वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर ला पकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली.

.         वरोरा तालुक्यातील नागरी येथे अवैधरित्या रेती वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती वरोरा महसूल विभागाच्या पथकाला मिळताच नागरी येथे नाका बंदी करून अवैद्य वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर वर जप्तीची कारवाई करण्यात आली. सदर ट्रॅक्टर  हिंगणघाट येथील योगेश सातपुते यांच्या मालकीचे असल्याचे समजते.  ही कार्यवाही दिनांक 14 फेब्रुवारी ला सायंकाळी 5.40 वाजता  करण्यात आली.

.         सदरची कार्यवाही तहसीलदार योगेश कौटकर  वरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार भगत, शिपाई सचिन शेळकी, शिपाई नकवे, कोतवाल बोधाने यांनी केली असून सदर ट्रॅक्टर रेती सह तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आला असून पुढील दंडात्मक कार्यवाही तहसीलदार वरोरा यांचे मार्फत करण्यात येणार आहे.

 

error: Content is protected !!