Home सामाजिक विसापुरातील महिलांचा स्नेहमिलन सोहळा सांस्कृतिक कार्यक्रमाने गाजला!

विसापुरातील महिलांचा स्नेहमिलन सोहळा सांस्कृतिक कार्यक्रमाने गाजला!

1172

वृद्धापासून विवाहित महिलांनी सादर केले नृत्य

महिलांना भेट वस्तू प्रदान करून केले सन्मानित

विसापूर : आजघडीला सर्वच क्षेत्रात महिला अग्रेसर आहे. चुल आणि मूल ही महिलाप्रतीची संकल्पना कालबाह्य होत आहे. ती आपल्या अस्तिवासाठी संघर्ष करत आहे. आपल्यातील सुप्त गुणांना वाव मिळण्याची संधी शोधत आहे.ही संधी महिलांना देण्याच्या अनुषंगाने राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून विसापूर येथील श्री पंढरीनाथ देवस्थान मंगल कार्यालयात रविवारी महिलांसाठी स्नेहमिलन सोहळा व हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी वृद्यापासून विवाहित महिलांनी नृत्यांच्या तालावर एकच धमाल केली.महिलांचा स्नेहमिलन सोहळा सांस्कृतिक कार्यक्रमाने चांगलाच गाजला.

.        पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने आयोजित महिलांच्या स्नेहमिलन सोहळा व हळदीकुंकू कार्यक्रम भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीस व ग्रा.पं.सदस्य विद्या देवाळकर यांच्या मार्गदर्शनात पार पडला. कार्यक्रमांचे उदघाट्न भाजपाच्या महिला आघाडीच्या जिल्ह्याध्यक्ष रेणुका दुधे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर माजी जि.प. सदस्य वैशाली बुद्धलवार, माजी जि.प.सदस्य अंजली पंदीलवार, बल्लारपूरच्या माजी नगरसेवक वर्षा सुंचुवार, जयश्री मोहुर्ले, माजी पं. स.सदस्य रंजना थेरे, ग्रा.पं. सदस्य सुरेखा इटनकर, शशिकला जीवने, स्नेहल टिंब डिया, सविता डाहुले, सविता बावणे आदींची उपस्थिती होती.

.        यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम दरम्यान वृद्धापासून विवाहित महिलांनी नृत्यांच्या तालावर मुक्त उधळण केली.माजी सरपंच रिता जिलटे यांच्या नेतृत्वात सादर करण्यात आलेल्या गोंधळ नृत्याने सारेच मंत्रमुग्ध झाले.यावेळी महिलांनी रांगोळी रेखाटण करून आपल्यातील कलेचे प्रदर्शन देखील केले.आत्मविश्वास व जिद्दीने सर्वच प्रकारातील नृत्याच्या सादरीकरणातून महिलांनी स्नेहमिलन सोहळा गाजविला. एका पेक्षा एक सरस नृत्यविष्कार यावेळी प्रेक्षकांनी अनुभवला. कार्यक्रमात सहभागी महिलांना भेट वस्तू प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

.        कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक विद्या देवाळकर यांनी केले.संचालन सरोज चांदेकर यांनी,तर आभार सुरेखा इटनकर यांनी मानले.यावेळी महिलांची उपस्थिती मोठया संख्येने होती.

error: Content is protected !!