Home चंद्रपुर जिल्हा विशेष तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये मदत जाहीर करा

तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये मदत जाहीर करा

1147

 शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांची मागणी 

चंद्रपुर : वरोरा – भद्रावती तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने शेतमालाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. त्यामुळे सदर नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये मदत जाहीर करण्याची मागणी शिवसेना (उबाठा) गटाचे जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात शिवसेना पदाधिकारी यांनी तहसिलदार वरोरा यांना निवेदनाद्वारे केली आहे.

.         वरोरा – भद्रावती तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याआधी नुकसान झालेल्या शेतमालाची देखील नुकसानीची मदत अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाही. यावर आणखी भर पडली असून गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये मदत जाहीर करण्यात यावी व खरीप हंगामात झालेल्या पिकांचे नुकसानीच्या पिकविम्याची रकम सर्व पिडीत शेतकर्यांना लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे. या मागणीला घेऊन शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.

.         यावेळी शहर प्रमुख संदीप मेश्राम, जेष्ठ शिवसैनिक तथा शिवदूत बंडू डाखरे, जेष्ठ शिवसैनिक अनिल गाडगे, उपशहर प्रमुख मनीष दोहतरे, युवासेना विधानसभा समन्वयक निखिल मांडवकर, सचिन चीडे व आदी शिवसैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!