Home चंद्रपुर जिल्हा विशेष घनश्याम नगरीतील रेती साठ्यावर एसडीपीओ चा छापा

घनश्याम नगरीतील रेती साठ्यावर एसडीपीओ चा छापा

1153

  रेती साठा महसूल विभागाच्या देखरेखीत  

वरोरा : वरोरा शहरातील घनश्याम नगरीत पडीत जागेवर असलेल्या रेतीच्या साठ्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी नयोनी साटम यांनी छापा टाकून यंत्र व सामुग्री अंदाजे ६० ब्रास रेतीचा साठा जप्त करून पुढील कारवाई साठी महसूल विभागाला सुपूर्द करण्यात आले. अवैध रेती साठा आणि अवैध रेती वाहतूक तस्करांवर महसूल व पोलीस विभागाने कारवाईचा बडगा उभारल्याने रेती तस्करांचे चांगलेच धाबे दणाणल्याचे दिसून येत आहे.

.       प्राप्त माहितीनुसार वरोरा शहरातील घनश्याम नगर येथे एका पडीत जागेत मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नयोनी साटम यांना मिळाली. माहिती मिळताच साटम यांनी पोलीस कर्मचार्‍यांना घेऊन घनश्याम नगर येथे छापा टाकला . या दरम्यान अंदाजे ५० ते ६० ब्रास रेती चा साठा आढळून आला. या रेतीच्या साठया जवळ जेसीबी क्र. एमएच २९ बीसी ९०९८ व हायवा क्र. एमएच ३४ एबी २९६०, एमएच ४० एके ७४४६ उभी असल्याने जप्तीची कारवाई करण्यात आली असून पुढील कारवाई साठी तहसिलदार, तहसील कार्यालय वरोरा यांना अहवाल पाठविण्यात आला. त्या आधारे तहसीलदार वरोरा यांनी पथक तयार करीत घनश्याम नगर येथील रेतीचा साठा, जेसीबी व २ हायवा ट्रक तहसील कार्यालय वरोरा च्या प्रांगणात देखरेखीत ठेवण्यात आले आहे.

तो साठा वैध की अवैध                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                               घनश्याम नगरीत पडीत जागेवर अंदाजे ६० ब्रास रेती साठा पोलिसांना आढळून आला. महसूल विभागाने तो साठा आपल्या देखरेखीत ठेवला. तो साठा कुणाचा याची महसूल विभाग चौकशी करीत आहे. साठा अवैध असल्याचे सिद्ध झाल्यास साठा मालकावर दंडात्मक कारवाई केली जाणार असून ती रेती, रेती अभावी घरकुलचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती तहसील कार्यालय वरोरा कडून देण्यात येत आहे.

error: Content is protected !!