वडसी येथील घटना
नेरी : चिमूर तालुक्यातील खातोडा शेतशिवारात जोड विद्युत पोलावर झांपर चे काम करीत असताना उच्च दाबाच्या वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून विनोद शिवदास दडमल (27 ) राहणार वडसी ता. चिमूर या तरुणाचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दि 11 फेब्रुवारी ला सकाळी १० वाजता घडली.
. चिमूर तालुक्यातील नेरी जवळील वडसी येथील विनोद दडमल या युवकाने नागपूर येथे लाईन दुरुस्तीचे कामे शिकून एका महिन्यापुर्वी तो घराच्या बांधकामं करण्यासाठी गावाला वडसी येथे आला होता. विनोद हा नेहमी गावातील छोट्या मोठ्या लाईनचे गावातील सार्वजनिक पोलवरचे दुरुस्तीचे काम करीत होता.तो नेहमी एका हाकेला लोकांच्या मदतीला धावून जात होता.मात्र आज अचानक त्याचा जिवंत विद्युत वाहिनीला हात लागल्याने विनोद ला जोरदार विजेचा धक्का बसला त्यात त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
. बातमी लिहिस्तोवर त्याचे प्रेत शवच्छेदन करण्याकरिता उपजिल्हा रुगणल्या चिमूर येथे नेण्यात आले आहे. घटनास्थळी चवरे पोलीस उपनिरीक्षक चिमूर, खातोडा वडसी येथील पोलीस पाटील उपस्थित होते. पुढील तपास चिमूर पोलीस करीत असून गावातुन अचानक विनोदच्या जाण्याने दुःखाचे वातावरण पसरले आहे.


