पिके जमीनदोस्त
नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी
पंकज रणदिवे
नेरी : चिमूर तालुक्यात अवकाळी पाऊस व जोरदार गारपिटीने हजेरी लावली. जवळपास 15 ते 20 मिनिट पावसाने अक्षरशः झोडपून काढले. यामुळे शेतकऱ्यांचा शेतातील तुर, लाखोळी, कापूस, चना, गहू पिकांचे अतोनात नुकसान झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास हिरविला आहे.
. सायंकाळी 5 चे सुमारास चिमूर तालुक्यातील, नेरी सह अनेक गावांत मोठ्या प्रमाणत अवकाळी पावसासह गारपीट सुरू झाली त्यामुळे काही काळ वीज पुरवठा खंडीत झाला होता. एकीकडे खरिपात सोयाबीन व इतर पिकाने व निसर्गाच्या लहरी पणाने शेतकऱ्यांचं कंबरडे मोडले होते त्यातच रब्बी मधून कसबस उत्पन्न होईल अशी आशा होती मात्र या अवकाळी पावसामुळे उभ्या असलेल्या तूर पीक, लखोळी, हरभरा ची मोठ्या प्रमनात नुकसान झाले आहे. तर झाडावर असलेला कापूस ओलाचिंब झालेलाआहे. या अवकाळी पाऊस व गारपिटी मुळे हातात आलेले पीक जमिनधोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहे त्यामुळे शासनाने तत्काळ प्रशासनातील अधिकाऱ्याना आदेशित करून पांचनामा करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे.


