Home चंद्रपुर जिल्हा विशेष गोविंदपूर येथील रस्ता व नालीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे

गोविंदपूर येथील रस्ता व नालीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे

1184

  सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष  

नागभीड : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून नागभीड तालुक्यात रस्ता व नालीचे बांधकाम सुरू आहे. मात्र नालीचे बांधकाम सुरू असतानाच नालीला भेगा पडत असल्याने बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप गावकर्‍यांकडून केला जात असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कमालीचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

.          नागभीड तालुक्यातील सोनापुर ते तलोधी रोडचे तर गोविंदपूर येथे नालीचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम सुरू असतानाच नाली बांधकामाला भेगा पडत असल्याचे दिसून येत आहे. या नाली बांधकामावर सदर कंत्राटदाराकडून पाणी सुद्धा टाकल्या जात नसून  कामाचा दर्जा हा निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप गावकर्‍याकडून केला जात आहे .   त्याच बरोबर सार्वजनिक बांधकाम कार्यालयाचे उपविभागीय अभियंता रामटेके व विभागीय अभियंता ठाकरे यांना नागरिकांनी माहिती दिली मात्र अधिकारी याकडे कानाडोळा करताना दिसत आहे .  त्यामुळे कंत्राटदार कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाची मिलीभगत आहे का ? असा सवाल नागरिक करत आहे .  या कामाची चौकशी करून कारवाही करावी अशी मागणी गोविंदपूर ग्रा. प. चे उपसरपंच भोजराज ज्ञानबोनवार यांनी केली आहे.

error: Content is protected !!