मोरेश्वर वासेकर यांची माहिती
नेरी : राज्यातील माध्यमिक शाळेमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असून याबाबत 7 जाने ला सावंतवाडी सिंधदूर्ग येथे सघटनेच्या 51 व्या राज्यस्तरीय अधिवेशनात शालेय शिक्षणमंत्री यांनी स्वतः उपस्थित राहून सदर प्रलंबित मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले. मात्र अजूनही शासनस्तरावरून कुठलेही निर्णय किंवा सकारात्मक कारवाई होतांना दिसत नसल्याने तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी कुठलीही चर्चा होताना दिसत नसल्याने नाईलाजाने दि 12 फ़्रेब्रुवारी ला राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना शिक्षण संचालय व शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
. माध्यमिक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या मागील अनेक वर्षांपासून अनेक प्रलंबीत मागण्या आहेत. त्याबाबत शासनाला अनेकदा निवेदन आंदोलन करून माहिती देण्यात आल्या होत्या. अनेकदा संघटनेच्या शिष्टमंडळाने शासनाच्या भेटी घेऊन माहिती सुद्धा दिल्या. आहे मात्र अनेक वर्षांपासून शासन नुसते आश्वासनाचे गांजर दाखवीत आहे. तेव्हा या वेळेस संघटनेने निर्णय घेऊन शिक्षण संचनालय व शिक्षण आयुक्तालय पुणे येथे दि 12 फ़्रेब्रुवारी ला महामोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच यावर शासनाने तोडगा काढला नाही. तर दि 20 फ़्रेब्रुवारी ला राज्यभर कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती म रा माध्यमिक कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर यांनी एका पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.


