Home चंद्रपुर जिल्हा विशेष अवैध दारूबंदीसाठी लाडबोरीच्या महिलांचा एल्गार

अवैध दारूबंदीसाठी लाडबोरीच्या महिलांचा एल्गार

1349

 तहसीलदार व ठाणेदार यांना निवेदन 

सिंदेवाही : पोलीस स्टेशन सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या लाडबोरी येथे मागील काही दिवसांपासून अवैध्य दारूचा महापूर सुरू असल्याने गावातील शांतता, सुव्यवस्था धोक्यात आली असून महाविद्यालयीन आणि शाळकरी विद्यार्थी सुद्धा दारूच्या आहारी जात असल्याने महिलांनी गावातील दारूबंदी साठी कंबर कसली असून लाडबोरीची अवैध दारूविक्री त्वरित बंद करण्यात यावी. अशा मागणीचे निवेदन देत शेकडो महिला सिंदेवाही तहसील कार्यालय सह पोलीस ठाण्यावर धडकल्या.

.        मौजा लाडबोरी येथे मागील अनेक दिवसापासून गावातील काही नागरिक अवैध्य दारूविक्री करीत असून यामुळे गावात तळीरामांची संख्या वाढून गावातील शांतता, सुव्यवस्था धोक्यात आली आहे. रस्त्याने ये जा करताना महिलांना त्रास होत आहे. त्यामुळे गावातील महिला संतापल्या आणि गावातील अवैध्य दारूविक्री त्वरित बंद करा म्हणून दारूविक्री करणाऱ्या नागरिकांना विनंती केली. मात्र कोणत्याही दारुविक्रेत्याने या महिलांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. आणि आपली अवैध्य दारूविक्री सुरूच ठेवली आहे. त्यामुळे शुक्रवारी गावातील असंख्य महिला एकत्र येत दारूबंदी साठी पुढे सरसावल्या. आणि दारूबंदीचे निवेदन घेऊन सिंदेवाहीचे तहसीलदार यांचे सह पोलीस स्टेशन वर धडकल्या. गावातील अवैध दारूविक्री त्वरित बंद करा. अशा मागणीचे निवेदन तहसीलदार तथा ठाणेदार यांना दिले असल्याने प्रशासन आता कोणती कारवाही करते, याकडे गावातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. यावेळी मनीषा नागदेवते, सुगंधा नगराळे, अनिता नागदेवते, तानाबाई मालके, कुंदा कामडी, मंदा चौके, माया तामगाडगे, मंजुळा उईके, भारती चाहांदे, यांचेसह गावातील शेकडो महिला उपस्थित होत्या.

error: Content is protected !!