वरोरा वनपरीक्षेत्र विभागाची कारवाई : ३ जणांना अटक
किशोर डुकरे
वरोरा – वरोरा वनपरीक्षेत्र कार्यालयात अंतर्गत येत असलेल्या वाघोली येथे मोराची शिकार झाल्याची गुप्त माहिती नुसार वनपरीक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे यांच्या नेतृत्वात वनविभागाच्या पथकाने धाड टाकून मुद्देमाला सह ३ आरोपीला ताब्यात घेतले सदर कारवाई सोमवारी दि.१५ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
. प्राप्त माहिती नुसार वनपरिक्षेत्र अधिकारी वरोरा सतीश शेंडे यांना मौजा वाघोली येथे मोराची शिकार झाल्याची गुप्त माहिती मिळाली. त्याआधारे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी वनकर्मचारी जे. के. लोणकर क्षे.स. शेगाव, डि. बी. चांभारे क्षे स. टेमुर्डा, चंदेल वनरक्षक, लडके वनरक्षक बोढे वनरक्षक यांनी वाघोली येथे धाड टाकली. या दरम्यान आरोपी आरोपी विलास आडकु नन्नावरे (४२) रा. वाघोली संयुक्त वनव्यवस्थापन समिती वाघोली अध्यक्ष, रामदास वामन जिवतोडे (३४) व दिगांबर तुळशिराम गजबे (३३) तिघेही रा. वाघोली पो. शेगाव. ता. वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवाशी असुन यांचे जवळ मोराचे 3.100 ग्रॅम मास, लोखंडी सुरा , लोखंडी हुक , मोराचे ४ पाय , मोराचे पंख व औषधी टाकलेले धान्य 1 किलो असा मुद्देमाल आढळून आला. यावेळी सर्व साहित्य जप्त करण्यात आलेले असुन त्याचेवर प्रा.अ.सु.क्र. 09169/229205 नुसार भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 9, 51 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
. पुढील चौकशी विभागीय वनअधिकारी प्रशांत खाडे चंद्रपूर व घनश्याम नायगमकर सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू), (अतिरिक्त) चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात सतिश शेंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वरोरा जितेंद्र लोणकर क्षे. स. शेगाव, दिवाकर चांभारे, क्षे. स. टेमुर्डा, चंदेल वनरक्षक मेसा, लड़के वनरक्षक साखरा, बोढे वनरक्षक शेगाव, तिखट वनरक्षक वरोरा व नेवारे वनरक्षक आजनगाव करीत आहे.


