Home सामाजिक माणिकगड सिमेंट कंपनीने केले नगर परिषद ला शोकसभा गृहाचे हस्तांतरण

माणिकगड सिमेंट कंपनीने केले नगर परिषद ला शोकसभा गृहाचे हस्तांतरण

1420

गडचांदूर

.            अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ सिमेंट कंपनी कडून नुकतेच शोकसभा गृहाचे हस्तांतरण स्थानिक नगरपरिषदला करण्यात आले.

.            अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या वतीने सामाजिक दायित्व उपक्रम राबविल्या जात आहे, गडचांदूर येथील मुक्तीधाम येथे 114 चौ. मी. लांबीचे शोकसभागृह , महिला व पुरुष प्रसाधान गृह आणि गेट यांचे बांधकाम करून त्यास नगरपरिषद गडचांदूर ला नागरिकांच्या सेवेसाठी हस्तानंतरण केलेत. अंतविधी नंतर शोकसभा घेतली जाते त्यावेळेस उन्ह, पाऊस आणि वारा या पासून अंतविधीला उपस्थित नागरिकांचे संरक्षण व्हावे व प्रसाधनाची व्यवस्था असावी हा त्या बांधकामा मागचा उद्देश आहे. या बांधकामामुळे अंतविधीला आलेल्या नागरिकांचा त्रास कमी होणार असे नगरपरिषद गडचांदूर यांनी मत व्यक्त केलेत.

error: Content is protected !!