आ. सुभाष धोटेंच्या हस्ते शेडवाही येथे १२३ लक्ष रुपयाच्या रस्ता बांधकामाचे भूमिपूजन. 

80

 

जिवती (ता. प्र) :– मुख्यमंत्री ग्राम सडक योजना चंद्रपूर २०२२ – २०२३ अंतर्गत जिवती तालुक्यातील प्र. जि. मा – ४५ ते शेडवाही ग्रा. मा. – ३२ रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे अंदाजे किंमत १२३. १४ लक्ष रुपये निधीच्या विकासकामांचे भुमिपुजन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले.

या प्रसंगी माजी सरपंच सोमाजी कोटनाके, माजी उपसरपंच गोसावी गुरुनुले, ग्रा. प. सदस्य संजय कोटनाके, भिकाजी मोहुर्ले, तेलंगाना मधिल निमनी चे सरपंच अंबादास कुमरे, निशानीचे शंकर आदे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.