Home चंद्रपुर जिल्हा विशेष शिवणीचे तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी तुपे यांचा कोट्यावधीचा घोटाळा दडपला?

शिवणीचे तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी तुपे यांचा कोट्यावधीचा घोटाळा दडपला?

1491

◾ आधार सुशिक्षित बेरोजगार संस्थेच्या खात्यात केले लाखो रुपये जमा.

◾ माहिती अधिकार कार्यकर्ते मुरलीधर गायकवाड यांनी केला भ्रष्टाचार उघड.

सिंदेवाही 

.            वनविभागात मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले असल्याची वरवर माहिती नेहमीच पुढे येतं असते. मात्र सिंदेवाही तालुक्यातील शिवणी वनपरिक्षेत्रातील तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी बी.के. तुपे यांनी वासेरा येथील आधार सुशिक्षित बेरोजगार संस्थेच्या माध्यमातून वनविभागात करोडो रुपयांचा घोटाळा केला असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर गायकवाड यांनी समोर आणला असून बी.के.तुपे आणि आधार संस्थेवर फौजदारी कारवाही करण्यासाठी भ्रष्ट्राचार निर्मूलन समिती जिल्हाधिकारी कार्यालय यांचेकडे तक्रार दाखल केली आहे.

.            शिवनी वनपरिक्षेत्रात गवत, पाचोळा कापणे, झुडूप कापणे व तो गोळा करून त्याचा जाळण्यासाठी वापर करण्याचा उपयोग करिता त्या कामाचे कंत्राट वासेरा येथील आधार सुशिक्षित बेरोजगार संस्था यांना दिले असल्याची कागदोपत्री माहिती समोर आली. तसेच जवळपास ७ लाखापेक्षा जास्त रक्कम आधार या संस्थेच्या वासेरा येथील बैंक ऑफ महाराष्ट्र बैंक खात्यात जमा केल्याची माहिती सुद्धा पुढे आली. आधार सुशिक्षित बेरोजगार संस्थेने वन विभागाला मजूर पुरविले असल्याचे कारण दाखविण्यात आले असले , तरी सन २०२० – २१ च्या रोखलेखा दस्तऐवज वरुन प्रत्यक्षात माहिती अधिकारात माहिती मागितली असता आधार सुशिक्षित बेरोजगार संस्था वासेरा यांनी जे मजूर पुरवठा केल्याची कारण समोर आले.

.            त्या मजुरांची नोंद शिवनी वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या नोंदवहीत व त्यांचे मोजमाप आणि अभिलेख उपलब्ध नसल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जी कामे केली त्यांचे मोजमाप पुस्तिका नाही, त्यांची अधिक्रुत नोंद नाही, व त्यांचे मूल्यांकन नाही. तर कोणत्या आधारावर त्या संस्थेच्या बैंक खात्यात वन विभागाने पैसे जमा केले हा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याने शिवणी येथील सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर गायकवाड यांनी तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी बी.के. तुपे यांनी कर्तव्यात असताना संबंध नसलेल्या बाहेरच्या संस्थेच्या खात्यात लाखो रुपये जमा केले असल्याने, तसेच आधार या संस्थेने लाखो रुपये आपल्या घशात घातले असल्याने यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाही करावी अशी मागणीची तक्रार भ्रष्ट्राचार निर्मूलन समिती जिल्हाधिकारी कार्यालय यांचेकडे केली असल्याची माहिती मुरलीधर गायकवाड यांनी माध्यमांना दिली आहे.

error: Content is protected !!