ट्रॅक्टर उलटल्याने चालकाचा मृत्यू

47

पावना येथील घटना

भद्रावती

.          ट्रॅक्टरचे समोरचे एक चाक अचानक निघाल्यामुळे ट्रॅक्टर पलटले. या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा घटनास्थळावरच दुर्दैवी मृत्यू झाला.

.          सदर घटना तालुक्यातील पावना- मोरवा या रस्त्यावर दिनांक 22 रोज शुक्रवारला सकाळी दहा वाजताच्या दरम्यान घडली. अतुल ज्ञानेश्वर पायघन, वय 28 वर्षे, राहणार मांगली असे या मृतक ट्रॅक्टर चालकाचे नाव असून त्याच्या मृत्यूमुळे मांगली गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे. सदर ट्रॅक्टर गिट्टी भरून मोरवा रस्त्याने जात असता पावणा गावाजवळ ट्रॅक्टरचे समोरील एक चाक निखळून पडले. चाक निखळल्यामुळे ट्रॅक्टर पलटी झाले. यात अतुल ज्ञानेश्वर पायघन याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी वरोरा येथे पाठविला.