Home Breaking News वरोऱ्यातील दत्त मंदिराजवळ तीन वाहनांची जोरदार धडक, दोन जण गंभीर

वरोऱ्यातील दत्त मंदिराजवळ तीन वाहनांची जोरदार धडक, दोन जण गंभीर

82

एकेरी वाहतुकीमुळे सफारी, टाटा एस आणि स्कुटीमध्ये विचित्र अपघात

वरोरा : चंद्रपूर-नागपूर या चौपदरी महामार्गावर वरोऱ्याजवळ असलेल्या दत्त मंदिरासमोर आज दुपारी ३:१० वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. महामार्गाच्या संथगतीने सुरू असलेल्या दुरुस्ती कामामुळे हा अपघात झाला असून, यामध्ये दोन जण अतिशय गंभीर जखमी झाले आहेत.

एकेरी मार्गावर तीन वाहने एकमेकांना धडकली

सध्या या महामार्गावर ठिकठिकाणी दुरुस्ती व बांधकामाचे काम सुरू आहे. दत्त मंदिराजवळ रस्त्याची एक बाजू कामासाठी बंद ठेवण्यात आल्याने वाहतूक ‘सिंगल रोड’वरून वळवण्यात आली आहे. याच एकेरी मार्गावर अशोक लेयलंड कंपनीची टाटा एस (MH 34 BZ 0385), एक ॲक्टिव्हा स्कुटी आणि सफारी कार (TG 08 AP 0124) यांच्यात जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

जखमींची प्रकृती चिंताजनक

या अपघातात जखमी झालेल्या दोन व्यक्तींना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, जखमींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

.          महामार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. संबंधित कंत्राटदाराने हे काम तातडीने पूर्ण करावे, अन्यथा आणखी जीवितहानी होण्याची शक्यता असल्याचे नागरिक आणि वाहनचालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!