Home सामाजिक मृत्यूच्या दाढेतून वृद्धाला बाहेर काढले

मृत्यूच्या दाढेतून वृद्धाला बाहेर काढले

49

भद्रावतीतील वसीम सय्यद यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक !

भांदक प्रेस क्लबकडून शूरवीरांचा यथोचित सत्कार

भद्रावती : शहरातील शिवाजीनगर परिसरात शनिवारी सकाळी एका ७५ वर्षीय वृद्धाचा जीव वाचवून वसीम रहमान सय्यद या तरुणाने मानवतेचा नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. विहिरीत पडलेल्या वृद्धाला स्वतःचा जीव धोक्यात घालून बाहेर काढल्याबद्दल भांदक प्रेस क्लबच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला.

.          शनिवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास शिवाजीनगर येथील एक वृद्ध इसम अचानक विहिरीत पडला. विहिरीत मोठ्या प्रमाणात चिखल असल्याने परिस्थिती चिंताजनक बनली होती. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते सुरज शाहा तातडीने तिथे पोहोचले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी मदतीचे आवाहन केले.सुरज शाहा यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्थानिक रहिवासी वसीम रहमान सय्यद यांनी कसलाही विचार न करता विहिरीत उडी घेतली. अत्यंत कौशल्याने आणि धैर्याने त्यांनी चिखलात फसलेल्या वृद्धाला सुरक्षितपणे बाहेर काढले. वसीम यांच्या या समयसूचकतेमुळे एका वृद्धाला जीवदान मिळाले.

प्रेस क्लबकडून गौरव

या धाडसी कृत्याची दखल घेत रविवारी भांदक प्रेस क्लबतर्फे वसीम रहमान सय्यद आणि सुरज शाहा यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रेस क्लबचे अशोक पोतदार, सुनील पतरंगे, अब्बास अजाणी, ईश्वर शर्मा, वतन लोणे तसेच नागरिक अफजल शेख आणि इमरान शेख उपस्थित होते.

.         सामाजिक कार्यकर्ते सुरज शाहा व वसीम सय्यद यांच्यासारख्या नागरिकांमुळे “समाजात आजही माणुसकी जिवंत आहे,” असा संदेश या घटनेतून मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!