भद्रावती
. तालुक्यातील साईबाबा ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्थेच्या इतिहासातील पहिल्यांदा झालेल्या निवडणुकीत एकता सहकार पॅनलने बाजी मारत विरोधी परिवर्तन पॅनलचा पराजित केला. संस्थेच्या सर्वच्या सर्व ११ जागांवर विजय मिळवित एकता सहकार पॅनलने साईबाबा सोसायटीवर एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे.
. माजी जि.प.सदस्य प्रवीण सुर यांच्या नेतृत्वाखाली एकता सहकार पॅनलला निवडणुकीपूर्वीच अनुसूचित जाती जमाती गटात मारोती पंढरे आणि भटक्या जमाती गटातून बळीराम मांढरे हे दोन जागा बिनविरोध मिळाली होती. अकरा जागांवर झालेल्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही. सर्वसाधारण गटातील सहा जागांवर एकता सहकार पॅनलचे मधुकर गोचे, हरिदास सुर, विठ्ठल काकडे, रमेश थेरे, महादेव बदकी, संतोष घानवडे हे विजयी झाले. महिला राखीव गटातील दोन जागांवर अमृता सुर, जिजा चवले, इतर मागास प्रवर्ग गटातून वासुदेव मत्ते हे एकता सहकार पॅनलचे उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत एकूण १४७३ मतदारांपैकी ७३२ मतदारांनी मतदान केले.
या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागून होते. अत्यंत प्रतिष्ठेची ही निवडणूक मानली जात होती. माजरी परिसरातील काही राजकीय नेतेही या निवडणुकीकडे लक्ष ठेवून होते. दरम्यान एकता सहकार पॅनेलने जोरदार विजय मिळवून साईबाबा ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्थेवर आपला वर्चस्व कायम ठेवला.
. एकता सहकार पॅनलच्या उमेदवारांनी एकतर्फी विजय प्राप्त करून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून जल्लोष केला. दरम्यान मतदारांनी एकता सहकार पॅनलवर जो विश्वास दाखविला त्याबद्दल सर्वांचे आभार प्रवीण सुर यांनी मानले.


