Home सामाजिक कर्तृत्वाला मानाचा मुजरा

कर्तृत्वाला मानाचा मुजरा

3

माजी जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा १९ एप्रिलला चंद्रपुरात भव्य नागरी सत्कार !

नव्या जिल्हाधिकारी वसूमना पंत यांचाही होणार स्नेहपूर्ण सन्मान

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार सोहळा 

चंद्रपूर : जिल्ह्याच्या विकासाला गती देत प्रशासनाला खऱ्या अर्थाने लोकाभिमुख करणारे माजी जिल्हाधिकारी जी.सी. विनय गौडा यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चंद्रपूरकरांच्या वतीने भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे संपन्न होईल.

.       जी.सी. विनय गौडा यांनी आपल्या कार्यकाळात जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. विशेषतः आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतील विकास प्रकल्पांना प्रशासकीय पातळीवर सकारात्मक सहकार्य देऊन त्यांनी विकास प्रक्रियेला वेग दिला. त्यांच्या याच योगदानामुळे चंद्रपूरकरांच्या मनात त्यांनी अढळ स्थान निर्माण केले आहे.

नव्या जिल्हाधिकाऱ्यांचेही होणार स्वागत
याच कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाची धुरा नुकतीच स्वीकारलेल्या वसूमना पंत यांचाही शुभेच्छापर नागरी सत्कार करण्यात येणार आहे. नव्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आगामी वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण क्षण असणार आहे.

दिग्गजांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार राहणार आहेत. तसेच या सोहळ्याला आमदार कीर्तिकुमार भांगडिया, आमदार देवराव भोंगळे, आमदार करण देवतळे यांसह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीने दोन्ही अधिकाऱ्यांचा यथोचित सन्मान केला जाईल.

.     हा सोहळा चंद्रपूरच्या सामाजिक ऐक्याचे आणि कृतज्ञता संस्कृतीचे प्रतीक ठरणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी चंद्रपूरच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!