Home चंद्रपुर जिल्हा विशेष वरोरा-चिमूर महामार्ग बनतोय ‘डेथ ट्रॅप’

वरोरा-चिमूर महामार्ग बनतोय ‘डेथ ट्रॅप’

352
https://navamarg.com/2026/01/17425/

सिमेंट रस्त्याच्या मधोमध जीवघेणा खड्डा !

विद्यार्थी आणि नागरिकांचा जीव टांगणीला

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे संताप

वरोरा : वरोरा ते चिमूर या मुख्य मार्गाचे कोट्यवधी रुपये खर्चून सिमेंटीकरण करण्यात आले खरे, मात्र हे नवीन बांधकाम आता वाहनधारकांसाठी अपघाताला आमंत्रण ठरू लागले आहे. या मार्गावरील माता महाकाली पॉलिटेक्निक कॉलेज आणि सिद्धिविनायक फार्मसी कॉलेजच्या दरम्यान रस्त्याच्या अगदी मधोमध एक मोठा आणि खोल खड्डा पडला आहे. यामुळे हजारो विद्यार्थी, नागरिक आणि शेतकऱ्यांना दररोज आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

.        नव्याने तयार करण्यात आलेल्या या सिमेंट रस्त्याला अनेक ठिकाणी भेगा पडल्या असून, कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे उघड होत आहे. या महामार्गावर वाहनांची रात्रंदिवस मोठी वर्दळ असते. मात्र, रस्त्याच्या मधोमध असलेल्या या खड्ड्यामुळे वाहनधारकांना अचानक वळण घ्यावे लागते किंवा ब्रेक लावावा लागतो, ज्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. इतकी गंभीर आणि जीवघेणी परिस्थिती असूनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. “प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी एखाद्या मोठ्या बलिदानाची किंवा भीषण अपघाताची वाट पाहत आहेत का ?” असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिक विचारत आहेत.

.      या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते प्रमोद नागापुरे यांनी प्रशासनाला तातडीने या खड्ड्यांची दुरुस्ती करावी आणि निकृष्ट ठरलेल्या या रस्त्याचे पुन्हा नव्याने दर्जेदार बांधकाम करावे. अशी मागणीही त्यांनी केली आहे.

error: Content is protected !!