Home चंद्रपुर जिल्हा विशेष चंद्रपूर-नागपूर मार्गावर कारच्या धडकेत ‘रोही’ ठार

चंद्रपूर-नागपूर मार्गावर कारच्या धडकेत ‘रोही’ ठार

366

संजीवनी धाब्यासमोर घडली घटना

चंद्रपूर : चंद्रपूर-नागपूर महामार्गावर खंडाळा नाल्याजवळ एका भीषण अपघाताची घटना घडली आहे. नागपूरकडून येणाऱ्या एका भरधाव कारने रस्ता ओलांडणाऱ्या रोहीला (नीलगाय) जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत रोहीचा जागीच मृत्यू झाला असून, अपघातानंतर काही काळ परिसरात खळबळ उडाली होती.

नेमकी घटना काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, एक कार नागपूरकडून चंद्रपूरच्या दिशेने जात असताना खंडाळा नाल्याजवळील संजीवनी धाब्यासमोर ही घटना घडली. विरुद्ध दिशेने एक रोही अचानक रस्त्यावर आल्याने कारची त्याला जोराची धडक बसली. कारचा वेग जास्त असल्याने रोही गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

चालकाने दाखविली तत्परता
अपघात घडल्यानंतर कार चालकाने पळून न जाता आपले वाहन थांबवले. रस्त्याच्या मध्यभागी मृत पावलेल्या रोहीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी चालकाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने रोहीला उचलून रस्त्याच्या कडेला केले. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

.       या मार्गावर वन्यजीवांचा वावर मोठ्या प्रमाणात असून, सुसाट वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे अशा अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे.

error: Content is protected !!