Home चंद्रपुर जिल्हा विशेष ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भटाळा येथे दारूचा ‘महापूर’

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भटाळा येथे दारूचा ‘महापूर’

428

पोलीस प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष ?

वरोरा : ऐतिहासिक वारसा आणि भक्तीचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भटाळा गावाचा चेहरामोहरा आता बदलू लागला आहे. ज्या गावाची ओळख ‘शंकर भोले’ मंदिरामुळे एक पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून होती, तेच भटाळा गाव आता सभोवतालच्या परि सरातील मद्यपींसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. गावात सुरू असलेल्या बेसुमार अवैध दारू विक्रीमुळे श्रद्धेच्या या भूमीत आता दारूचा महापूर वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

.      भटाळा हे गाव परिसरातील महत्त्वाच्या चार गावांना जोडणारे मध्यवर्ती केंद्र आहे. मात्र, याच संपर्क व्यवस्थेचा गैरफायदा अवैध दारू विक्रेत्यांनी घेतला आहे. सध्या आजूबाजूच्या गावांतील मद्यपी मोठ्या संख्येने भटाळा येथे दारू पिण्यासाठी येत आहेत. यामुळे गावातील शांतता आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.

.      वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या भटाळा येथे खुलेआम दारू विक्री सुरू आहे. भटाळा गावापासून अगदी 2 ते 3 किलोमीटर अंतरावर शेगाव पोलीस ठाणे असताना देखील अवैध दारूचा गोरखधंदा सुरू आहे, हे पोलीस प्रशासनाला माहीत नाही की माहीत असूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे?” असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. पोलिसांच्या या भूमिकेमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाडस अधिकच वाढले आहे.

.      या वाढत्या अवैध दारू विक्रीमुळे गावातील लहान मुलांपासून तरुण युवक दारूच्या आहारी गेले आहे. यामुळे गावातील महिलामध्ये दहशतीचे व चिंतेचे वातावरण आहे. या अवैध दारू विक्री मूळे धार्मिक स्थळाचे पावित्र्य नष्ट होत असून, मद्यपींच्या राबत्यामुळे गावातील सामाजिक आरोग्य बिघडले आहे. याकडे तातडीने लक्ष देऊन भटाळा गावातील अवैध दारू विक्री कायमची बंद करावी आणि गावाचा ऐतिहासिक व धार्मिक लौकिक जपण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

error: Content is protected !!