Home सामाजिक भद्रावतीत सायबर सुरक्षितता कार्यशाळा उत्साहात संपन्न

भद्रावतीत सायबर सुरक्षितता कार्यशाळा उत्साहात संपन्न

392

भद्रावती : अॅक्सॉन एज्युकेशन, भद्रावती यांच्या वतीने सायबर सुरक्षितता विषयावर आयोजित कार्यशाळा रविवार, दि. ४ जानेवारी २०२६ रोजी यशस्वीरीत्या पार पडली. डिजिटल युगात वाढत चाललेल्या सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत या कार्यशाळेत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

.       या कार्यशाळेचे प्रमुख वक्ते म्हणून एमकेसीएलचे प्रशिक्षक मार्गदर्शक नफिस अहमद यांनी उपस्थितांना सायबर सुरक्षितता, ऑनलाइन फसवणूक, सामाजिक माध्यमांचा सुरक्षित वापर, संकेतशब्द सुरक्षितता, फसवणूक संदेशांद्वारे होणारे हल्ले (फिशिंग अटॅक) यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सोप्या व समजण्याजोग्या भाषेत मार्गदर्शन केले.

.       या कार्यशाळेला विद्यार्थी, शिक्षक तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रश्नोत्तर सत्रात उपस्थितांनी सक्रिय सहभाग घेत आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांच्या वतीने वक्त्यांचा सन्मान करण्यात आला व उपस्थित सर्व सहभागींचे आभार मानण्यात आले. डिजिटल सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.

error: Content is protected !!