Home चंद्रपुर जिल्हा विशेष शिरच्छेद केलेला तरुणाचा झुडपात आढळला मृतदेह 

शिरच्छेद केलेला तरुणाचा झुडपात आढळला मृतदेह

443

हत्या करून झुडपात फेकल्याचा अंदाज

चंद्रपूर नागपूर महामार्गांवरील नंदोरी येथील घटना

वरोरा : चंद्रपूर–नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत नंदोरी येथील पंजाबी धाब्याजवळ झुडपात एका अज्ञात इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर मृतदेहाचे डोके व धड वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आले असून पायाची बोटे व पोटाच्या भागावर मांस नसल्याने कुत्र्यांनी लचके तोडले असावे असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. मृत इसमाचे अंदाजे वय ३० वर्षांच्या आसपास असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

.        सदर इसमाची निर्घृण हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह झुडपात टाकण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेहाची अवस्था पाहता ही हत्या अंदाजे ७ ते ८ दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

.       ही धक्कादायक घटना १६ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. जनावरे चारत असताना एका शेतमजुराच्या नजरेस झुडपात पडलेला मृतदेह आल्याने त्याने तात्काळ वरोरा पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अज्ञात इसमाची ओळख पटविण्याचे व हत्या कोणी व कशासाठी केली, याचा तपास वरोरा पोलीस कसून करीत आहेत.

error: Content is protected !!