Home राजकीय बल्लारपुरात भाजपा यादीत चंदेल घराण्याचे वर्चस्व

बल्लारपुरात भाजपा यादीत चंदेल घराण्याचे वर्चस्व

509

नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक

रेणुका दुधे यांना नगराध्यक्ष पदाची लाटरी

बल्लारपुर : चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका असलेल्या बल्लारपूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक साठी भाजपाची नगराध्यक्ष व नगरसेवक पदाची यादी जाहीर केली आहे. यामध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदाची लाटरी जेष्ठ नेत्या रेणुका दुधे यांना लागली असून 34 नगरसेवकांच्या यादीवर नजर टाकली असता चंदेल घराण्याचे वर्चस्व दिसून येत आहे. भाजपाचे जेष्ठ नेते चंदनसिंग चंदेल यांचे बंधू लखनसिंग चंदेल, बहिण किरण चंदेल व मुलगा विश्वजितसिंग चंदेल यांना भाजपा कडून नगरसेवक पदाची संधी मिळाली आहे.

.     बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात बल्लारपूर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक भाजपासाठी अत्यंत महत्वाची आहे. येथे माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे कार्यक्षेत्र असून मागील निवडणुकीत येथे भाजपाची सत्ता होती. ही सत्ता कायम राखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. मात्र नेहमी घराणेशाहीला विरोध करणाऱ्या भाजपाने बल्लारपूर नगरपालिकेत चंदेल घराण्याचे नगरसेवक पदाची उमेदवारी देताना झुकते माप दिल्याचे यादीवरून दिसून येत आहे.

.     भाजपाने जाहीर केलेल्या यादीत प्रभाग एक मध्ये रेखा तोडसाम व लखनसिंग चंदेल, प्रभाग दोन मोहीत डंगोरे व शुभांगी जाधव, प्रभाग तीन पप्पु गेडाम व कल्पना वाघमारे, प्रभाग चार कावेरी हरकावत व महेंद्र ढोके, प्रभाग पाच ओमप्रकाश प्रसाद व दिपमाला यादव, प्रभाग सहा जयश्री मोहुर्ले व स्वामी रायबरम, प्रभाग सात पुष्पा देव ईकर व अजय दुबे, प्रभाग आठ चौवंता केशकर व अब्दुल आबीद अब्दुल गफ्फार शेख, प्रभाग नऊ निलेश खरबडे व शुभांगी भेंडे (शर्मा), प्रभाग दहा अनीरुप पाटील व अनिता गटल्लेवार, प्रभाग अकरा दिपाली पाझारे व अशोक साळवे, प्रभाग बारा निरज झाडे व सुवर्णा भटारकर, प्रभाग तेरा शालु कमरे व किरण चंदेल, प्रभाग चौदा सारीका कनकम व अजहर शेख, प्रभाग पंधरा दिनेश गोंदे व ज्योती आमटे, प्रभाग सोळा येल्लया दासरफ व वर्षा सुंचूवार, प्रभाग सतरा विद्या खरतड व विश्वजितसिंग चंदेल असे भाजपाचे बल्लारपूर नगरपालिकेत उमेदवार आहे.

error: Content is protected !!