Home चंद्रपुर जिल्हा विशेष भद्रावती नगराध्यक्षपदी ओबीसी प्रवर्गाचा उमेदवार विराजमान होणार

भद्रावती नगराध्यक्षपदी ओबीसी प्रवर्गाचा उमेदवार विराजमान होणार

575

भद्रावती : सोमवार दिनांक ६ रोज सोमवारला मुंबई येथे पार पडलेल्या नगराध्यक्ष पदाच्या सोडतीत भद्रावती नगर परिषद ओबीसी म्हणजे नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षित झाला असून अनेक इच्छुकांच्या, नवागतांच्या, प्रदीर्घ अनुभवी दिग्गजांच्या आशा पल्लवित होऊन त्यांनी आज खऱ्या अर्थाने सुटकेचा श्वास घेतला.

.      भद्रावती नगर परिषद १९९८ मध्ये अस्तिवात आली ते आजतागायत प्रथम अध्यक्ष सुनील नामोजवार ते अनिल धानोरकर अशी पुरुषी मक्तेदारी विशेषत्वाने बाळासाहेबांच्या शिवसेनेची भद्रावती नगर परिषदेवर मक्तेदारी राहिलेली आहे. यावेळी कोणता पक्ष व कोणती उमेदवार बाजी मारेल हे काळच ठरवेल.  ऑक्टोबर २०२३ रोजी धानोरकरांची कारकिर्द संपताच प्रशासकीय कारकिर्द सुरू झाली आणि वॉर्ड नगरसेवक व नगराध्यक्ष अश्या लोकप्रतिनिधी अभावी शहराचा उलट गतीने विकास सुरू असल्याचा प्रशासकीय अनुभव जनतेला आला.

.      निवडणूक मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आयोगाला ३१ जानेवारी २०२६ पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊन ही प्रक्रिया पूर्ण करावयाची असल्याने प्रभाग रचने पाठोपाठ आज दिनांक. ६ रोज सोमवारला राज्यात नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यानुषंगाने भद्रावती नगर परिषदेवर नगराध्यक्ष पदी ओबीसी म्हणजेच नागरिकांचा मागास प्रवर्ग यावर शिक्कामुर्तब झाले.

.      नगराध्यक्ष पद जाहीर झाले आता वॉर्ड निहाय अनुसूचित जाती, जमाती, महिला व नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग महिला, सर्वसाधारण महिला आरक्षण सोडत दिनांक ८ ऑक्टोबर रोज बुधवारला पार पडेल. यानंतर खऱ्या अर्थाने भद्रावतीच्या राजकारणात रंगत येईल. आतापर्यंत झालेल्या प्रथम पक्ष बदल नाट्याचा दुसरा अंक सुरू होऊन परत काय घडामोडी घडेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तूर्तास नगराध्यक्ष पद आरक्षण जाहीर झाल्याने तर्क वितर्क ना विराम मिळाला आहे.

error: Content is protected !!