आसाळा शेतकऱ्यांच अनोखा उपक्रम
वरोरा : ओला दुष्काळामुळे पूर्णपणे खराब झालेले सोयाबीन लिफाफ्यात ठेवून स्पीड पोस्टद्वारे जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके यांना आसाळा येथील शेतकऱ्यांनी पाठवले. सततच्या पावसामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असून, माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजक किशोर डुकरे यांनी खांबाडा येथे रास्ता रोको आंदोलन राबवले होते.
. यावेळी बच्चु कडू यांनी म्हटले की, “शेतकऱ्यांच्या शेतावर स्थानिक आमदार, खासदार व पालकमंत्री उपस्थित नसणे या जिल्ह्याचे दुर्दैव आहे.” या विधानानंतर दुसऱ्या दिवशी पालकमंत्री अशोक उईके यांनी दौरा जाहीर केला. दौऱ्यानिमित्त, त्यांनी महामार्गाजवळील शेतातील पीक पाहणी केली आणि शेतकऱ्यांची व्यथा प्रत्यक्ष अनुभवली.
. यानंतर आसाळा येथील शेतकऱ्यांनी विशेष ग्रामसभा आयोजित करून ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली. या उपक्रमांतर्गत साठ पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी खराब झालेले सोयाबीन उपडून पालकमंत्र्यांना स्पीड पोस्ट ने पाठवले, ज्यामध्ये भटाळा येथील काही शेतकऱ्यांचा समावेशही होता. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी थेट मागणी त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली.
. यावेळी शेतकरी नेते किशोर डुकरे, प्रमोद गायकवाड, भैयाजी गायकवाड, आशिष जांभुळे आणि मोठ्या संख्येने शेतकरी व शेतकरी महिला उपस्थित होत्या.


