Home चंद्रपुर जिल्हा विशेष धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगरांचा रास्ता रोको

धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगरांचा रास्ता रोको

600

वरोरा : तालुक्यातील टेमुर्डा येथे चंद्रपूर – नागपूर महामार्गांवर मुख्य मागणी धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे या मागणी करीता आज बुधवार दिनांक 1 आक्टोबर टेमुर्डा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

.         धनगर नेते दीपक बोऱ्हाडे यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून धनगर समाजाची आरक्षणाची अंमलबजावणी करून धनगर समाजाला एसटी प्रवर्गा मध्ये समाविष्ट करणे, शेळ्या मेंढयाना चराईसाठी वनविभाग आरक्षित जागा देणे, अहिल्यादेवी होळकर महामेष योजना चालु करणे, यशवंतराव घरकुल योजनेचा लाभ मिळावा, अश्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलनात टेमुर्डा येथे हजारो च्यासंख्येने धनगर समाज रस्त्यावर उतरले होतें. या दरम्यान रस्त्यावर बसून यळकोट यळकोट जय मल्हार, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं घोषणाबाजी करून काही वेळ चक्कजाम केला होता. .

.         यावेळी धनगर आरक्षणाची अंमलबजावणी सरकारने लवकरात लवकर करून धनगर योजनेचा लाभ समाजाला मिळाला पाहिजेत. आरक्षण अंमलबजावणी झाली नाही, तर सरकारच्या मागे धनगर समाज कधीच उभा राहणार नाही असे वक्तव्य आयोजकांनी केले. या आंदोलनाचे ने्तृत्व आयोजक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती, धनगर समाज महासंघ, धनगर जमात संघटना, धनगर कर्मचारी संघटना, मल्हार सेना, अहिल्यावहिनी महिला सेना यांनी केले होते. या आंदोलनात शेकडो धनगर बांधव उपस्थित होतें.

error: Content is protected !!