Home चंद्रपुर जिल्हा विशेष “रापटा नको… कायमस्वरूपी पूल हवा !”

“रापटा नको… कायमस्वरूपी पूल हवा !”

572

वडगाव–पवनी ग्रामस्थांचा हुंकार

प्रफुल आसुटकरांचा ठाम इशारा

वरोरा : वडगाव आणि पवनी या दोन्ही गावांची जनता आता हुंकार भरून प्रशासनासमोर उभी ठाकली आहे. वर्षानुवर्षे नाल्यावर पूर येतो, वाहतूक थांबते, रुग्णांचे जीव धोक्यात येतात, विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होते, शेतकऱ्यांचा माल अडकतो… या सगळ्याचा अंत पाहून ग्रामस्थांचा आक्रोश उफाळला आहे. “रापट्याचं आश्वासन नको, आम्हाला कायमस्वरूपी पूल हवा!” असा ठाम नारा दिला गेला.

.        ग्रामपंचायत जळका तर्फे सार्वजनिक बांधकाम विभाग, वरोरा येथे सरपंच सौ. सरिता सु. सातपुते व उपसरपंच प्रफुल आसुटकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. वडगाव–पवनीच्या नागरिकांची मोठी उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली.

.        प्रफुल आसुटकर यांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले की, “वडगाव हा मार्ग वर्धा जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या मार्गावर पूलाशिवाय दरवर्षी जनतेला संकटांना सामोरं जावं लागतं. पवनीचा नाला, समशानभूमी जवळील नाला आणि गोठाडी आंब्याच्या झाडाजवळील नाल्यावर पूल उभारणे अपरिहार्य आहे.”

.        गावातील महिला, ज्येष्ठ नागरिक व तरुण वर्ग प्रफुल आसुटकर यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. ग्रामस्थांचा सूर एकच – “वेळेत निर्णय घ्या, अन्यथा वडगाव–पवनी जनतेचा हुंकार थेट प्रशासनाला हादरवून सोडेल!”

error: Content is protected !!