एसीबीची कारवाई
प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रासाठी तब्बल दोन लाखांची मागणी
चंद्रपूर : जिल्हा पुनर्वसन कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी नरेंद्र विठोबा खांडेकर यांना 30 हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई रविवारी 28 सप्टेंबर रोजी प्रशासकीय भवन, चंद्रपूर येथे करण्यात आली.
. याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार हे चंद्रपूर येथील रहिवासी असून त्यांच्या आईची मौजा चारगांव, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर येथील घर व खुली जागा औष्णीक विद्युत केंद्र चंद्रपूर येथे गेलेली असल्याने सदर मालमत्तेवर तक्रारदार यांचे मुलीचे नांव प्रकल्पग्रस्त व्यक्ती म्हणुन नामनिर्देशीत केले होते. महाराष्ट्र राज्य वीज निर्मीती कंपनी मर्या. मुंबई यांचेकडून घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये तक्रारदार यांची मुलगी ही प्रकल्पग्रस्त या राखीव जागेतून ‘कनिष्ठ अभियंता’ या पदाकरीता निवड झालेली होती.
. तक्रारदार यांचे मुलीचे प्रकल्पग्रस्त या राखीव जागेतून निवड झालेली असल्याने प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची पुर्णपडताळणी करण्याकरीता जुलै 2025 मध्ये जिल्हा पुर्नवसन कार्यालय चंद्रपूर येथे पत्र प्राप्त झाले होते. त्यानुसार तक्रारदार हे त्यांच्या मुलीसह प्रशासकीय भवन चंद्रपूर येथील जिल्हा पुर्नवसन कार्यालय येथील आलोसे राहा.
. महसुल अधिकारी नरेंद्र विठोबाजी खांडेकर यांना भेटले असता तक्रारदार यांना त्यांच्या मुलीच्या नोकरीकरीता प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची पुर्नपडताळणी करून अहवाल महाराष्ट्र राज्य वीज निर्मीती कंपनी मर्या. मुंबई यांना पाठविण्याकरीता 2 लाख रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती सध्या 1 लाख रूपये व अहवाल तयार झाल्यानंतर 30 हजार रूपये पैशाची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदार यांनी 1 लाख रूपये जुलैमध्ये दिलेले होते.
. त्यानंतर दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी तक्रारदार यांनी आलोसे खांडेकर यांना फोन करून मुलीच्या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राचे पुर्नपडताळणी अहवाल पाठविले किंवा कसे याबाबत विचारणा केली असता आलोसे खांडेकर यांनी तक्रारदार यांना कार्यालयात बोलावून उर्वरीत 30 हजार रुपये घेवून या अन्यथा अहवाल पाठविणार नाही असे म्हणाले. परंतु तक्रारदार यांना आलीसे सहायक महसुल अधिकारी नरेंद्र विठोबाजी खांडेकर यांना लाच रक्कम देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर येथील अधिकाऱ्यांना भेटुन आज रविवार 28 सप्टेंबरला रोजी तक्रार दिली. तक्रारदार यांचे प्राप्त तक्रारीवरून आज रविवार 28 सप्टेंबरला आलोसे सहायक महसुल अधिकारी नरेंद्र विठोबाजी खांडेकर यांची पंचासमक्ष पडताळणी केली असता त्यांनी स्वतः करीता 30 हजार रुपये लाच रक्कमेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यावरून आज 28 सप्टेंबरला सापळा कार्यवाही दरम्यान आलोसे सहायक महसूल अधिकारी नरेंद्र विठोबाजी खांडेकर यांनी प्रशासकीय भवन चंद्रपूर येथील उपजिल्हाधिकारी (पुर्नवसन) कार्यालय चंद्रपूर येथील कार्यालयात 30 हजार रूपये लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपासकार्य सुरू आहे.
. सदरची कार्यवाही सागर कवडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर, माधुरी बावीस्कर, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले, पो. हवा. हिवराज नेवारे, विजेंद्र वाढई, पोशि अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, प्रदिप ताडाम, राजेंद्र चौधरी, सचिन गजभिये, महेश माहूरपवार, मेघा मोहुर्ले, पुष्पा काचोळे, सतिश सिडाम सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर व संदीप कौरोसे, मो.प.वि. चंद्रपूर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.


