शिवार फेरीतून उघड झाले वास्तव
पादंण रस्त्यांची समस्या निकाली काढण्याची मागणी
बल्लारपूर : बल्लारपूर तहसील प्रशासनाच्या माध्यमातून १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवडा साजरा करण्यासाठी गुरुवार (दि. ११) रोजी शिवार फेरी काढली. महसूल अधिकारी आरती दुलत यांच्या मार्गदर्शनात व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष शेतशिवारात पाणंद रस्त्यांची पाहणी करण्यात आली. यावेळी शिवारफेरीच्या माध्यमातून विसापूर गावाच्या हद्दीतील पाणंद रस्त्यांची भीषणता लक्षात आली. यावेळी महिला शेतकऱ्यांनी पाणंद रस्त्यासाठी एकच आक्रोश व्यक्त करून महसूल अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. केवळ शिवार फेरी काढून कार्यभार करू नका, तर पाणंद रस्त्यांची समस्या सोडवा म्हणून जोरदार मागणी केली.
![]()
. बल्लारपूर तहसील प्रशासनाने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवडा साजरा करण्याचे नियोजन केले आहे. याच अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत पहिल्या टप्प्यात गावपातळीवर पाणंद रस्ते विषयक मोहिम राबविण्याचे योजले आहे. या मालिकेत गुरुवारी शिवारफेरीचे आयोजन महसूल अधिकारी आरती दुलत यांच्या मार्फत आयोजित केली.
. या शिवारफेरीत विसापूर येथील सरपंच वर्षा कुळमेथे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, रिना कांबळे, सुरज टोमटे, गजानन पाटणकर, हर्षला टोंगे, वैशाली पुणेकर, सुरेखा ईटनकर, शशीकला जीवने, विद्या देवाळकर यांच्या सह महिला शेतकऱ्यांनी शेतशिवारात पाणंद रस्ते पाहिले.
. यावेळी महिला शेतकऱ्यांनी शेतशिवारात पाणंद रस्त्यांची समस्या पहिल्यांदा निकाली काढा. केवळ देखावा म्हणून शिवार फेरी काढू नका, असा सज्जड इशारा महसूल अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना दिला. त्याच वेळी अचानक एका शेतकऱ्यांची बैलबंडी चिखलमय पाणंद रस्त्याने येताच सर्वांचा जीव कासावीस झाला. यावेळी महिला शेतकरी आशा काळे, मंजुषा पावडे, छाया टोंगे, प्रितम पाटणकर, सुलभा टोंगे, प्रफुल्ला डाहुले, सिमा टोंगे, अश्विनी काळे, पुजा डाहुले, शारदा पावडे, मंदा टोंगे, वर्षा टोंगे, मंजुषा ताजने, तानेबाई टोंगे, मंजुषा टोंगे, ललिता टोंगे, मंजुषा अमित पावडे आदींनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना पाणंद रस्त्यांच्या समस्यासाठी फैलावर घेतले. शेतशिवारातील पाणंद रस्त्यांची समस्या निकाली काढण्यासाठी आक्रोश केला.


