आसाळा येथे प्रशासनाची तातडीची मदत
पालक व विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास
वरोरा : तालुक्यात शुक्रवारी दुपारी ढगफुटी सदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शेगाव-टेमुर्डा मार्गावरील आसाळा-भटाळा दरम्यानच्या नाल्याला अचानक आलेल्या पुरामुळे शाळा-कॉलेजला गेलेले येरखेडा, आबमक्ता, पारडी, साखरा, लोदीखेडा व वडगाव खेमजई परिसरातील तब्बल ६० ते ७० विद्यार्थी परतीच्या वाटेवर अडकले.
![]()
. संध्याकाळी बसने गावाकडे जाताना नाल्यावरून प्रचंड वेगाने पाणी वाहत असल्याने बसचालकाने धोका पत्करून विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यास नकार दिला. त्यामुळे सर्व विद्यार्थी आसाळा येथे थांबले. लहान शाळकरी मुलांना उपाशी राहावे लागू नये म्हणून गावकऱ्यांनी त्यांना जेवण पुरविले. मात्र तब्बल चार तास ही घटना प्रशासनाच्या लक्षात आली नाही, ही बाब आश्चर्याची ठरली.
. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांना ही माहिती मिळताच त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधला. तहसीलदार योगेश कौटकर, गटविकास अधिकारी गजानन मुंडकर, मंडळ अधिकारी अजय निखाडे, तलाठी रितेश आमटे, सुनील राऊत व कोतवाल राजू चांदेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
. पुराचे पाणी ओसरताच प्रशासनाने मानवविकास मिशनची बस विद्यार्थ्यांसह सुखरूप बाहेर काढली. या सुटकेनंतर विद्यार्थ्यांनी व पालकांनी बसचालक-वाहक तसेच प्रशासनाचे आभार मानले
सदर हा पूल पुष्कळ दिवसापासून बांधलेले असून त्या पुलावर पाईप टाकण्यात आले आहे. मात्र पाऊस जास्त झाला की त्या नाल्याचे पाणी पुलावरून वाहत असतात त्यामुळे कित्येकदा शाळकरी मुले, गुराखी, रुग्णांना वाट पाहावी लागतात त्यामुळे सदर पुलाची लवकरात लवकर उंची वाढवून देण्यात यावी.
किशोर डुकरे, सामाजिक कार्यकर्ता वरोरा


