ग्रामीण विभागातील शेतकऱ्यांच्या उच्चशिक्षित गुणवंत मुलांचा सत्कार
चंद्रपूर
. ताडाळी ग्रामस्थ, स्पर्धा परीक्षा युथ जनरेशन, व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने आयोजित ग्रामीण स्तरावरील उच्चशिक्षित विद्याविभूषित गुणवंताचा सत्कार समारंभ सोहळा इंदिरा गांधी सांस्कृतिक ताडाळी सभागृहात पार पडला.
. या कार्यक्रमाला डॉ.पंजाबराव देशमुख आय.ए.एस. अकॅडमी अमरावती चे संचालक डॉ.नरेशचंद्र काठोळे मुख्य मार्गदर्शक म्हणून लाभले होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी अप्पर पोलीस आयुक्त नागपूर चे डॉ.दिलीप झलके, महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ तथा जनमंच सदस्य नागपूर चे रवींद्र तिराणिक, प्रा. डॉ. चंद्रकिरण घाटे, श्रीकांत देवळे, प्रमोद रामेकर जनमंच कार्यकारी पदाधिकारी नागपूर, डॉ. रमेश व-हाटे, ग्रा.प.ताडाळी सरपंच संगीता पारखी, प्रामुख्याने प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
. याप्रसंगी आरटीओ स्पर्धा परीक्षा पास करून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गडचिरोली येथे सहायक मोटर वाहन निरीक्षक या पदावर रुजू झालेले किरण शालिक पारखी तसेच एम.पी.एस.सी. परीक्षा पास करून जलसंपदा सहा. अभियंता या पदावर नियुक्त झालेल्या रेणू भास्कर जीवतोडे यांचा. माजी अप्पर पोलीस आयुक्त नागपूर डॉ. दिलीप झलके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दिलीप झलके यांनी आपल्या अनुभवातून स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी सिविल सर्विस मध्ये व्यक्तित्व, जिज्ञासा, चिकाटी व अथक परिश्रम करण्याची तयारी असली पाहिजे व ते अत्यंत गरजेचे आहे. असे विद्यार्थ्यांना याप्रसंगी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह जिज्ञासा आणि अभ्यासाबाबत गंभीर असणे गरजेचे आहे याबद्दल सांगितले.
. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक भास्कर जीवतोडे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन भगत यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थ स्पर्धा परीक्षा युथ जनरेशन अशोक पारखी जिल्हा उपाध्यक्ष अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, सुरेश खांडारकर, विजय ठेंगणे यांनी केले.


