संतप्त विद्यार्थ्यांचे चक्का जाम आंदोलन*
चिमुकल्यांनी दोन तास अनेक वाहने रोखून धरले.
सिंदेवाही
. तालुक्यापासून पाथरी मार्गांवर असलेल्या मरेगाव,धानोरा,सावरगाटा,टोला ,या गावातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी बस वेळेवर येत नसल्याचा कारणाने मौजा मरेगाव या गावी एकत्र येत चक्का जाम आंदोलन करून तब्बल दोन तास अनेक वाहनांना रोखून धरल्याने अखेर पोलिसांना आंदोलनस्थळी जावून आंदोलन मागे घेण्यास चिमुकल्यांची विनंती करावी लागली.
. सिंदेवाही तालुक्यातील मरेगाव, धानोरा, सावरगाठा, टोला, या गावातील मुली व मुले शालेय शिक्षण घेण्यासाठी सिंदेवाही इथे ये जा करीत असतात. असतात सकाळ पाळीत येणाऱ्या मुली व मुले यांना सकाळी येणारी बस उशिरा येत असल्याने त्याना शाळेतील अभ्यासाच्या दोन तासापासून वंचित राहावं लागतआहे. आणी सायंकाळच्या सुमारास शाळा ५ वाजता शाळा महाविद्यालय सुटल्या नंतर सदर मार्गांवरील शाळेकरी मुलांना घरी जाण्यासाठी रात्री ८ वाजता शिवाय सिंदेवाही बसस्थानक वरून बस सुटत नाही. त्यामुळे ५.३० वाजता पासून रात्री ८ वाजेपर्यंत हे शाळेकरी मुले मुली, बस ची वाट बघत बसस्थानकावर राहत असतात त्यामुळे त्यांचा अभ्यास मागे पडत आहे. , सदर मार्गांवरील गावे ही जंगलव्याप्त परिसरातील असून यामार्गावर नेहमी जंगली जनावरांचा संचार सुरू असतो. त्यामुळे विध्यार्थ्यांचा सुरक्षतेचाप्रश्न निर्माण होतो. या मुलांना घेऊन जाणारी बस सिंदेवाही वरून ८.३० वाजता जरी सुटली तरी शेवटच्या गावातील विद्यार्थ्यांना घरी पोहचायला ९.३० ते १० वाजत असल्याने या मुलींसोबत काही अनुचित प्रकार घडल्यास याची जबाबदारी कोण घेईल? हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे. या सर्व समस्या लक्षात घेऊन प्रत्येक गावातील पालक वर्गानी मरेगाव येथील सरपंच संदीप ठाकरे यांना भेटून वरील सर्व समस्या सांगितली. त्यामुळे सरपंच ठाकरे यांनी विध्यार्थ्यांना होत असलेल्या समस्या बाबत स्वतः आगर व्यवस्थापक ब्रम्हपुरी यांना आपल्या स्तरावरून निवेदन दिले,पण सरपंच यांनी दिलेल्या निवेदनावर आगार व्यवस्थापकाने कोणतीही करावाही केली नाही. तसेच सरपंच यांनी शाळेच्या विध्यार्थ्यांना होत असलेल्या गैरसोयी बाबत वारंवार प्रशासनाला निवेदनाद्वारे कळवित.
. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे ११/१०)२०२३ रोजी वरील सर्व गावातील चिमुकले विद्यार्थी एकत्र येत आपल्या हक्कसाठी स्वतःच्या पुढाकारातून चक्का जाम करीत वाहतूक थांबविली. व घटनेची माहिती सिंदेवाही पोलिसांना दिली.सदर चक्का जाम आंदोलन ठिकाणी पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक सागर महल्ले, रणधीर मंदारे, मंगेश मातेरे उपस्थित झाले व आंदोलन करीत असलेल्या विध्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व संबंधित आगार व्यवस्थापक शी बोलून विध्यार्थ्यांना होत असलेल्या असुविधेबाबत कळविले, व आंदोलन करीत असलेल्या विध्यार्थ्यांना विश्वासात घेऊन त्याना त्यांचे प्रश्न निकाली काढण्याची हमी घेऊन रस्त्यावर झालेला चक्का जाम मोकळा करून देण्याची विनंती केली, त्यानुसार आंदोलन करीत असलेल्या विध्यार्थ्यांनी रस्ता मोकळा करीत ग्राम पंचायत कार्यालय मरेगाव येथील पटागणात जमा झाले ,आणी आगार व्यवस्थापक ब्रम्हपुरी यांनी आंदोलनकर्त्या विध्यार्थ्यांच्या समस्या ऐकून सिंदेवाही इथून ५.३० वाजता बस सोडण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे तूर्तास विद्यार्थ्यांनी चक्का जाम आंदोलन मागे घेतले आहे.

