Home चंद्रपुर जिल्हा विशेष तीन नराधमाचा 19 वर्षीय युवतीवर सामूहिक अत्याचार

तीन नराधमाचा 19 वर्षीय युवतीवर सामूहिक अत्याचार

837

दोन आरोपी अटकेत एक फरार

चिमूर तालुक्यातील दुसरी घटना

नेरी : आजीच्या घरी पायदळ जात असलेल्या एका युवतीला आजीच्या घरी दुचाकीने सोडून देतो असे म्हणत आरोपीने चिमूर वरून ५ किलोमीटर असलेल्या तळोधी नाईक येथील शेत शिवारात असलेल्या शेतातील झोपडीमध्ये नेऊन तीन नराधमांनी युवतीवर अत्याचार केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली असून दोन नराधमांना चिमूर पोलिसांनी अटक केली असून एक आरोपी फरार आहे. प्रतीक सुनील सटोने (२६) राहणार नेताजी वार्ड चिमूर, विकी उर्फ विक्रांत खुशाल सटोणे (२९) राहणार नेताजी वार्ड चिमूर, अंकित संजय काकडे (३१) राहणार टीचर कॉलनी चिमूर असे नराधम आरोपीची नावे आहेत.

.      पोलीस सूत्रानुसार चिमूर शहरातील 19 वर्षीय युवती आपल्या आजीचे घरी शहरातील एका मोहल्ल्यातून एकटीच पायदळ जात असताना आरोपी प्रतीक सुनील साठोणे या युवकांने पीडित युवती जवळ येऊन मी तुला तुझे आजीचे घरी सोडून देतो असे म्हणून पीडित मुलीला आपल्या मोटरसायकलवर बसवून तिलाजबरदस्तीने चिमूर वरून ५ किलोमीटर अंतरावरील तळोधी नाईक येथील शेत शिवारात असलेल्या शेतातील झोपडीत नेले. तिथे तीच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर विकी उर्फ विक्रांत खुशाल साठोणे व अंकित संजय काकडे या दोघांनी तेथे येऊन त्यांनी सुद्धा संगणमत करून पीडित मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केला. याची कुठेही वाच्छता केल्यास तुला पाहून घेण्याची धमकी पीडिताला दिली. घाबरलेल्या अवस्थेत युवतीने सोमवारी दिनांक 20 मे ला दुपारी 1.43 वाजता पोलीस स्टेशन चिमूर येथे पीडित मुलींच्या तक्रारीवरून तीन जणा विरुद्ध अप.क:- 205/2025, कलम 64, 70 (1), 351 (2), 3 (5) भारतीय न्याय संहितानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

.      गुन्हा दाखल होताच चिमूर पोलिसांनी तपासचक्र फिरवीत विक्की साठोणे व प्रतीक साठोणे या दोन आरोपीला अटक करण्यात आली असून तिसरा आरोपी अंकित काकडे हा फरार असून पोलीस त्याच्या शोध घेत आहेत.

चिमूर तालुक्यातील दुसरी घटना                                                                                                              तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. याआधी चिमूर शहरातील दोन नराधमांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. त्या विरोधात चिमूर शहर पेटून उठले होते. मोठा जमाव पोलीस स्टेशन वर चालून गेला होता. आरोपीला तात्काळ अटक करा अशी मागणी घेऊन शहरात तोडफोड करीत महामार्गांवर टायर जाळून निषेध केला होता. आणि पोलिसांनी तोडफोड करण्याऱ्या आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता परत त्याच घटनेची शाही वाळत नाहीं तोच दुसरी अत्याचाराची घंटना घडल्याने चिमूर पोलीस विभागावर मोठा ताण पडल्याचे दिसून येत आहे.

error: Content is protected !!