मजुरांच्या सुरक्षिततेसाठी वनकर्मचाऱ्यांची गस्त
नेरी : मागील दोन आठवड्यापासून तेंदू संकलनच्या कामाला सुरुवात झाली आहे. जीवाची पर्वा न करता पोटाची खळगी भरण्यासाठी मजूर तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी जंगलात जातात. जंगलात जाताना आणि येतांना सुरळीत मजूर यावे यासाठी नियमित गस्त पथक नेरी खांबाडा बिटात वनविभाग राबवित आहे. हिंस्त्र पशूंच्या परिसरात जाण्यास मजुरांना बंदी घालण्यात आली आहे. या बिटातील प्रत्येक गावात दवंडी आणि बचावासाठी मार्गदर्शन केले जात आहे. वनविभागाच्या सहकार्याने नेरी खांबाडा बिटात तेंदूपत्ता सिजन सुरळीत सुरू आहे.
. नुकत्याच तेंदूपत्ता संकलन करताना जिल्ह्यात सहा महिलांचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेल्याच्या घटना ताज्या आहेत त्यामुळे वनविभाग एकदम अलर्ट झाला आहे कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी जंगलातील वाघाच्या वावर असलेल्या परिसरात मजुरांना तेंदू संकलन करण्यास बंदी करण्यात आली आहे या ठिकांनी वनविभागाचे अधिकारी ग्रास्तीवर असून प्रत्येक क्षेत्रात ग्रस्त घालीत मजुरांना मार्गदर्शन करीत आहेत आणि मजुरांच्या बचावासाठी सकाळ पासून मजूर जंगलात प्रवेश करतात तेव्हापासून तर जंगलातुन परत येईपर्यंत ग्रस्तपथक मजुरांवर पाळत ठेवीत आहे ही कामगिरी तळोधी वनपरिक्षेत्र अधिकारी कन्नमवार यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रसहायक सी एन रासेकर यांच्या नेतूत्वात राबविण्यात येत आहे या कामात तीन वनरक्षक आणि सतरा मजूर नियमित कार्यरत आहेत त्यामुळे मजुरवर्ग तसेच तेंदू संकलन सुरळीत सुरू आहे.
. नेरी खांबाडा या दोन्ही बिटात हिंस्त्र पशु व वाघाचे वास्तव्य आहे. या बिटतील लावारी अडेगाव को काजळसर सिरपूर शिवनपायली गावातील जंगलात तीन ते चार वाघ असल्याचा अंदाज आहे. तर गोंदेडा परिसरात चार वाघ असल्याचे निदर्शनास आले आहे. यात नर आणि मादी असून काही स्थानिक आहेत. तर काही वाघ हे बाहेर च्या जंगलातून ये जा करीत आहेत या सर्वांवर वनविभागाची करडी नजर असून कमेरे आणि इतर साहित्य वापरून त्यावर नजर ठेवली जात आहे. यासाठी वनरक्षक संभाजी वडझे, वनरक्षक पाटील वनरक्षक अडाने आणि सतरा मजूर कर्तव्यावर आहेत. सर्वच सकाळीच अलर्ट राहून कामावर हजर होतात यामुळे या दोन बिटात तेंदू संकलन उत्तमरित्या सुरू असून 50 टक्क्यांच्या वर जाऊन निर्धारित कोटा पूर्ण करणार असल्याचे मजुरांनी सांगितले.


