वीज वितरण केंद्राच्या मागे लागली आग
नेरी : येथील विज वितरण महामंडळाच्या मागील बाजूस विद्युत पोलवर स्पार्किंग होऊन आग लागली. यात लागूनच असलेले शेतकऱ्यांचे शेणखते जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली.
. गुरुवारी दुपारच्या सुमारास विजेच्या गडगडाट सह जोरदार वारा सुटला. यामुळे विज वितरण महामंडळालाच्या मागील बाजूस असलेल्या विद्युत पोल च्या तारा एकमेकांना आदळल्या यामुळे घर्षण होऊन ठिणग्या लागूनच असलेल्या शेणखतावर पडल्याने आग लागली आणि अनेकांचे शेणखत जळून खाक झाले. आग लागताच वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ अग्निशमन दलाला पाचरण केले. माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाचे वाहन पोहचत आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.


