Home चंद्रपुर जिल्हा विशेष वरोऱ्यात एकाच रात्री पाच दुकाने फोडली

वरोऱ्यात एकाच रात्री पाच दुकाने फोडली

873

21 हजाराची रोख रक्कम पळविली

चोरटे सिसिटीव्हीत कैद

तीन अज्ञात चोरट्या विरुध्द गुन्हा दाखल

व्यापाऱ्यात घबराटीचे वातावरण

वरोरा : शहरातील बोर्डा चौकात असलेल्या येरणे कॉम्प्लेक्स मधील पाच दुकानाचे शेटर वाकवून गल्ल्यातील रोख रक्कम पळविल्याची घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली. धास्तावलेल्या सर्व दुकानदारांनी या संदर्भात गुरुवारी (दि.15) संयुक्तरित्या वरोरा पोलीसात अज्ञात चोरट्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. एकाच रात्री पाच ही दुकानें फोडल्याने स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड चिंता अन्‌ घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

.        प्राप्त माहितीनुसार बोर्डा ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या येरणे कॉम्प्लेक्स मध्ये बुधवारी मध्यरात्री 2.20 वाजता अज्ञात तीन चोरट्यांनी धुमाकूळ घालीत एका पाठोपाठ पाच दुकानाचे शटर वाकून रोखरक्कम चोरी केली. यामध्ये प्रकाश शेंडे यांचे आराध्या किराणा स्टोर्स चे 12 हजार, अविनाश ढंगळे यांचे आरती किराणा स्टोर्स चे 3 हजार, राजु चामाटे यांचे किराणा दुकानातील 500 तसेच राजेश लांबट यांचे शिव कृपा प्रोवीजन किराणा दुकानातील 5 हजार पाचशे रुपये तर अनंता चौधरी यांचे सलुन दुकानाचा समावेश आहे. असा एकुन 21 हजार रुपये रोख रक्कम चोरट्यानी पळविली. एकाच रात्री एवढ्या मोठ्या प्रमाणात दुकानांचे शटर तोडल्यामुळे व्यापारात मात्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान ह्या चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. त्यात तीन युवक दुकानांचे शटर वाकूवून चोरी करतांना दिसत आहेत. सीसीटीव्हीत कैद झाल्यानुसार तीन चोरट्यांनी मध्यरात्री 2 ते 2.30 तास धुमाकूळ घातला असून इतर साहित्याला हात न लावता केवळ गल्ल्यातील रोख रक्कमेची चोरी केली असल्याचे दिसून येत आहे.

.        दुकानदारांना सकाळी घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात चोरट्या विरुद्ध वरोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरोरा पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.

error: Content is protected !!