वरोरा : संकल्प फाउंडेशन वरोरा च्या वतीने भदंत् उपाली परीसर मालवीय वार्ड येथे महाकारुणीक तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीच्या मंगल पर्वावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत बुद्धजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. मनोहर पाटिल हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. जावेद पाशा, संजय मगर यांची विशेष उपस्थिती होती. तर विशेष अतिथी म्हणून आनंदराव वानखेडे, स्वागताध्यक्ष प्रा.संजय बोधे व संकल्प फाउंडेशन वरोरा चे अध्यक्ष विठोबा मुन विचारमंचावर उपस्थित होते.
. सकाळी ठिक ९ वाजता धम्मध्वजारोहन आणि बुद्ध वंदनेचा कार्यक्रम पार पडला. यावेळी महेश भगत, सुरेश पाटिल, हर्षकुमार निखाडे यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमाना मेणबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करुन माल्यार्पण करण्यात आले. तर गुलाब शेंडे, आणि विठोबा मुन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित धम्म बंधु भगिनीना संजय बोधे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी दिवंगत केशवराव ठमके, डॉं. प्रेमकुमार खोब्रागडे, डॉं. तक्षशिल सुटे आणि डॉं. प्रा. धनराज डहाट यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सायं.७ वाजता प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी शहरातील विविध वार्डातील, विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहुन सहकार्य केले.
. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड. अरविंद पेटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन राजु डांगे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकल्प फाउंडेशन वरोरा च्या सर्व महिला पुरुष कार्यकर्ते मंडळींनी परीश्रम घेतले.


