गावकऱ्यांची मागणी
कोरपना : राजुरा आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी तीन ते चार किलोमीटर अंतरावर डिव्हाइडरला कट पॉईंट देण्यात आले आहे.त्यामुळे अधिकचे अंतर मोजून उलट येत अनेक गावात प्रवेश करावा लागतो आहे.
. तालुक्यातील रुपापेठ, गोविंदपुर, दुर्गाडी, कोठोडा बूज, मेहंदी, कन्हाळगाव, कातलाबोडी फाटा येथे जाण्या व येण्यासाठी या अडचणी उद्भवत आहे. शिवाय महामार्गावर उभारण्यात आलेले प्रवासी निवारे गावच्या फाट्यापासून पाचशे मीटर हून अधिक अंतरावर आहे. तेथे रस्ता ओलांडून जाणे येणे जिकिरीचे ठरत आहे. यातच बस सुटून जाण्याचे प्रकार वाढले आहे. या प्रवासी निवाऱ्यात उन्ह, वारा, पाऊस पासून कुठलाच बचाव होत नसल्याने ते कुचकामी ठरले आहे. महामार्गावरील गावच्या फाट्यावर गावाचे नाम फलक, फाट्यावरून पूढे जाणाऱ्या मोठ्या गावाचे दिशादर्शक फलक लागले नाही. त्यामुळे नवीन व्यक्तींना तो नेमका फाट्यावरील रस्ता कुठे जातो हे देखील कळत नाही. रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपणही योग्यरीत्या झाले नाही. त्यामुळे संपूर्ण मार्ग ओसाड दिसून येतो.
चुकीचे दिशादर्शन कोरपना व गडचांदूर येथील उडानपूल पूर्वी गावाचे दिशादर्शक फलक लावण्यात आले आहे. यात गडचांदूर येथील फलकात लखमापूर व कोरपना येथील फलकांत वणी दिशादर्शन चुकीचे दर्शवण्यात आले. त्यामुळे प्रवासात संभ्रम निर्माण होत आहे. वणी व लखमापूरचे दिशा निर्देशन सुधारण्याची गरज आहे. शिवाय उडान पूल पूर्वी महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी हे महत्त्वाचे स्थळाचे दिशानिर्देशन फलक लावणे आवश्यक आहे.


